
Accused was killed his own father,arrest in just two hours by the police.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील विसापुरात येथे काल संध्याकाळी एक विपरीत घटना घडली. सख्या मुलाने आपल्या वडिलांना कुऱ्हाडीने वार करून ठार केले. शहरापासून पासून अवघ्या ४ किमी अंतरावर विसापूर येथे ही खुनाची घटना (Visapur murder case) घडली आहे. या खुनाच्या घटनेत मुलाने बापाचा कुऱ्हाडीने खून (The boy killed his father with an axe) केला. त्यामुळे, संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत व्यक्तीचे नाव दामोदर भिकाजी तांगडे (वय ५५) असून खून करणाऱ्या आरोपी मुलाचे नाव तेजस दामोदर तांगडे (वय २४) आहे. आरोपी तेजस हा खून करून फरार होण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, पोलिसांच्या (Police) तात्काळ कारवाईने आरोपीला पकडण्यात यश आले.
[read_also content=”बैलगाड्यांसह लाकूड तस्करांची टोळी गडचिरोली वनविभागाच्या ताब्यात https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gadchiroli/a-gang-of-timber-smugglers-along-with-bullock-carts-is-in-the-possession-of-gadchiroli-forest-department-nraa-231541.html”]
विशेष म्हणजे मृत दामोदर यांचा मोठा मुलगा सुरजागड येथील पोलिसांच्या सी ६० या पथकात कार्यरत आहे. लहान मुलगा आरोपी तेजस हा बेरोजगार होता. वडिलांसोबत तेजसचा नेहमीच वाद होत असे. या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृत शव हा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
[read_also content=”कामठी येथे दरोड्याच्या उद्देशाने फायरिंग करत केली दगडफेक, घटना सीसीटीव्हीत कैद https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/stone-pelting-fired-at-kamathi-with-intent-to-rob-incident-captured-on-cctv-nraa-232531.html”]
वडील नेहमीच दारूच्या नशेत अभ्रद्र वागतात, बोलतात. बरेच वेळा त्याने वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, वडील दारू पिल्यानंतर त्याला उलटसुलट बोलायचे. त्याला त्यांचा खूप राग यायचा. परंतु, आता राग अनावर होऊन संतापून त्याने कुऱ्हाडीने हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गावंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. योग्य तपासामुळे आरोपीस अवघ्या दोन तासांत ताब्यात घेण्यात आहे.