बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत (Mahabharat) या मालिकेमध्ये ‘भिम’ (Bhima) ही भूमिका साकारणारे अभिनेता प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांचे आज सकाळी निधन झाले. दिल्ली येथील अशोक विहार येथे राहत्या घरी ७४ व्या वर्षी प्रवीण कुमार सोबती यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनेक दिवसापासून ते आजारी होते. त्यांना पाठी दुखीची समस्या जणवत होती. काही महिन्याअगोदर त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांची कन्या निपुणिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला होता.
प्रवीण कुमार यांचा अभिनय जगाशी दूरदूरपर्यंतचा संबंधच नव्हता. प्रवीणकुमार सोबती यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केले. ते डिस्कस थ्रोअर आणि डिस्कस थ्रोअर और हैमर होते. प्रवीण कुमार सोबती यांनी आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकून देशाचं नाव उंचावलं होतं. त्यांनी दोनदा ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्वही केलयं. प्रवीण यांना 1967 मध्ये सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘अर्जुन पुरस्कार’ देण्यात आला.
[read_also content=”कैसे मैं कहू तुझसे रहना है तेरे दिल में…प्रपोज करायचं आहे? तर ‘या’ चित्रपटांपासून मिळेल आयडिया… https://www.navarashtra.com/movies/this-movie-proposal-scene-help-you-to-propose-to-your-love-one-nrps-234589.html”]
प्रवीण कुमार यांनी 1960 आणि 70 च्या दशकात अॅथलेटिक्समध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. 1966 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने डिस्कस थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर 1966 आणि 1970 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशाचा गौरव केला. 56.76 मीटर अंतरावर डिस्कस फेकण्याचा आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांचा विक्रम होता. खेळांत निपुण असलेले प्रवीण कुमार सोबती यांना अचानक पाठीत दुखू लागले, त्यामुळे त्यांना खेळ करताना त्रास होऊ लागला.
क्रीडा विश्वात नाव कमावल्यानंतर प्रवीण कुमार बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंटची नोकरी करू लागले. 1980 मध्ये त्यांनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवलं. प्रवीण कुमार यांच्या उंचीमुळे त्यांना भीमाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. ही व्यक्तिरेखा त्यांनी इतक्या उत्साहाने साकारली की लोक त्यांना भीमाच्या नावानेच ओळखू लागले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
[read_also content=”‘झुंड’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज, अमिताभ बच्चन दिसले खास भूमिकेत https://www.navarashtra.com/latest-news/video-gallery/jhund-teaser-release-amitabh-bachchan-seen-in-lead-role-nrsr-234533.html”]
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की तो प्रदिर्घ काळापासून घरी आहे आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तसेच पेन्शनसाठी सरकारकडे दाद मागितली आहे. आज हा अष्टपैलू अभिनेता आपल्यात नाही, पण त्याच्या चाहत्यांच्या हृदयात तो सदैव जिवंत राहील.