
sushmita sen
बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेल्या सुष्मिता सेनला (Sushmita Sen) काही काळापूर्वी हृदयविकाराचा झटका (heart attack) आला होता. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली. खुद्द अभिनेत्रीने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. या बातमीने चाहत्यांची चिंता वाढवली होती. फॅन्सही तिच्या आरोग्याविषयी जाणुन घेण्यास आतुर होते. आता सुष्मिताच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. आपल्या तब्येतीकडे लक्ष देत तिने योगा करण्यास सुरुवात केली आहे.
[read_also content=”चारित्र्याच्या संशयाने सुखी संसाराचा घात! टाइल्स कापण्याच्या मशीनने पत्नीचे केले 6 तुकडे, 2 महिने पाण्याच्या टाकीत ठेवले https://www.navarashtra.com/crime/husband-killed-his-wife-over-disputes-cut-her-body-by-tiles-cutter-machine-kept-in-water-tank-for-2-months-nrps-374596.html”]
सुष्मिता सेनने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. या फोटोमध्ये सुष योगा आउटफिटमध्ये ओपन स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘व्हील ऑफ लाइफ. माझ्या कार्डिओलॉजिस्टने परवानगी दिली आहे. स्ट्रेचिंग सुरू झाले आहे. किती मजेशीर भावना. ही माझी होळी आहे, तुमती कशी आहे? तुम्हांला खूप खूप प्रेम. असं तिने म्हण्टलयं.
काही दिवसांपुर्वी सुष्मिता सेनने तिच्या वडिलांसोबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिला हृदयविकाराच्या झटका आल्याची माहिती दिली होती. पोस्टमध्ये सुश तिच्या वडिलांसोबत दिसली. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘माझ्या वडिलांचे काही शब्द- तुमचे हृदय नेहमी आनंदी आणि धैर्यवान ठेवा आणि जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा ते तुमच्या पाठीशी उभे राहतील. नुकताच मला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माझ्या हृदयरोगतज्ज्ञांनी मला सांगितले की माझे हृदय खूप मोठे आहे.
सुष्मिता सेनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आर्या 3 मध्ये दिसणार आहे. या मालिकेचे शूटिंग नुकतेच सुरू झाले. अभिनेत्री लवकरच बरी होऊन पुन्हा एकदा सेटवर परतणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय ही अभिनेत्री सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेब सिरीजच्या माध्यमातून कार्यकर्त्या गौरी सावंतला जगासमोर आणले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्रीने या वेब सीरिजमधील तिचा पहिला लूक उघड केला होता.