मुंबई : ‘गंगूबाई काठियावाडी’ या बहुप्रतिक्षित सिनेमात अजय देवगणची मध्यवर्ती भूमिका आहे. या सिनेमात अजय देवगण रहिमलालाची भूमिका साकारत आहे. नुकतीच अजयच्या पात्राची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या व्हिडीओमध्ये अजय डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. अजयने या सिनेमातील त्याचा लूक शेअर लिहिले की,”इमान..धर्म…धंदा.. आम्ही येत आहोत सहा दिवसांत”.
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि हुमा कुरेशी (Ajay Devgn) प्रमुख भूमिकेत आहेत.
आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमा बायोग्राफिकल ड्रामा आहे. आलिया भट्ट या चित्रपटात ‘गंगूबाई’ची भूमिका साकारत आहे. गंगूबाईला तिच्याच नवऱ्याने 500 रुपयांना विकले होते. या चित्रपटाची कथा लेखक हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाईंच्या आयुष्यातील प्रत्येक पैलूला स्पर्श करण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. एक सामान्य मुलगी कामाठीपुराची क्वीन कशी बनते? हे सर्व या सिनेमात पाहायला मिळेल.