मागील काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महायुतीत काहीही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यातच महायुतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील नाराज असून त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी गेले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ वाटप आणि त्यानंतर पालकमंत्रिपदाबाबत झालेल्या वादामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या मनधरणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार गिरीश महाजन हे त्यांची मनधरणी करण्यासाठी दरे गावी जाणार आहे. या सगळ्यातच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
अशातच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) उपस्थित राहण्यासाठी दावोसला गेले आहेत. पण इकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उदय सामंताविषयी भलताच दावा केला आहे. “एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत जे केलं, त्यांच्या भविष्यातसुद्धा तेच आहे. भाजप मोदी- शाह कोणालाही सोडत नाही. विशेष म्हणजे, ते त्यांचे सख्खे नाहीत त्यांना तर ते अजितबातच सोडत नाहीत. आता उदय सामंतांचं बघा ना, त्यांना दावोसला घेऊन गेले. उदय सामंतांसोबत आज २० आमदार असल्याची माहिती माझ्याकडे आहे. सरकार स्थापनेच्या वेळी एकनाथ शिंदे नाराज असताना उदय होणार होता. पण एकनाथ शिंदे सावध झाले. असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.
मंत्रिमंडळ स्थापन करण्यात उशीर, पालकमंत्री ठरवण्यात उशीर, पालकमंत्री घोषित करूनही आपापसात धुसफूस सुरू आहे. भाजपकडे पुरेसं बहुमत असतानाही त्यांच्या इतर दोन मित्रपक्षांचीही चांगली ताकद आहे. 200 पेक्षा जास्त बहुमत असतानाही मंत्रिपद देऊन त्याला पुन्हा स्थगिती दिली जाते. कॅबिनेटमध्ये आता खून आणि मारामाऱ्या व्हायच्या बाकी राहिलं आहे.असा टोलाही संजय राऊतांनी महायुतीव निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा राजकीय उलाढाली होणार, असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
संजय राऊतांच्या या दाव्यावर स्वत: उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबाबत केलेल्या विधानाची दखल घेतली. पण संजय राऊतांचा हा दावा म्हणजे निव्वळ राजकीय अपरिपक्वतेचे उदाहरण आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो राजकीय उठाव केला, त्यामध्ये मी सहभागी होतो. त्यामुळेच मला दोन वेळा उद्योगमंत्रीपद मिळाले, याची मला पूर्ण जाणीव आहे. एका सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय वाटचालीसाठी केलेल्या प्रयत्नांचे महत्व मी कधीही विसरू शकत नाही.
म्हाळुंगेमधील स्टील उद्योजकावर अज्ञांताकडून गोळीबार
माझे आणि एकनाथ शिंदे यांचे नाते राजकारणाच्या पलीकडचे आहे. त्यामुळे आमच्यात भांडण लावण्याचा कोणताही केविलवाणा प्रयत्न यशस्वी होणार नाही. आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबांतून आलेलो आहोत. त्यामुळे अशा दोन सर्वसामान्य कुटुंबातील नेत्यांमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र करू नका. शिवाय, राऊत यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची कित्येक वेळा भेट घेतली आहे, हे देखील मला माहीत आहे.
मी राजकीय तत्त्वांचे पालन करतो आणि वैयक्तिक पातळीवर बदनामीकारक टीका करत नाही. परंतु, एका सामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी फालतू षडयंत्र रचू नका, हीच माझी सूचना आहे. संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी केलेली विधाने खोटी आहेत, यावर मी ठाम आहे. भविष्यात ज्या वेळी गरज लागेल, त्या वेळी मी सहकारी म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पार पाडीन. अशा षडयंत्रांना मी कधीही महत्त्व देत नाही, आणि त्यामुळे आमच्यात गैरसमज निर्माण होणार नाहीत, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.