नागपूर (Nagpur). शिवसेना नगरसेवकाच्या (Shiv Sena corporator,) हत्यप्रकरणी (the murder) नागपुरच्या केंद्रीय कारागृहात (Nagpur Central Jail) शिक्षा भोगत असलेला अंडरवल्ड डॉन अरुण गवळी (Underworld don Arun Gawli) सध्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे (online education lessons) गिरवित आहे. अरुण गवळीच्या बीएची मार्कशीट (Arun Gawli BA marksheet) लागली आहे. परीक्षेत अरुण गवळी पाच पैकी तीन विषयात चांगल्या गुणाने पास देखील झाला आहे.
[read_also content=”Online पॉर्न Video पाहता का? सावधान ! तुमचा ‘personnal Data’ ट्रॅक होतोय, रिपोर्टमधून मोठा खुलासा https://www.navarashtra.com/latest-news/do-you-watch-online-porn-videos-be-careful-your-personal-data-is-being-tracked-nrat-156982.html”]
अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) हा सध्या कारागृहातून शिक्षणाचे धडे (Education) गिरवत असल्याची माहिती पुढे आली आहे. अरुण गवळी सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवकाच्या हत्ये प्रकरणी नागपूर कारागृहात (Nagpur Central Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
शिक्षणासाठी त्यानं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात (Indira Gandhi Open University) बीएच्या (BA) अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे. बीएमध्ये (Bachelor of Arts) अरुण गवळी ने “द स्टडी ऑफ सोसायटी”, सोसायटी इन इंडिया”, “फाउंडेशन कोर्स इन हुम्यानिटी अँड सोशल सायन्स यासारख्या विषयांची निवड केली आहे. सध्या अरुण गवळी बीएच्या अंतिम वर्षात आहे.
माहितीनुसार अरुण गवळी ‘बीए’च्या परीक्षेत पाच पैकी तीन विषयात चांगल्या गुणाने पास देखील झाला आहे. इंदिरागांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश देण्याआधी त्याने अभ्यासक्रमाविषयी आणि परीक्षेच्या प्रक्रियेविषयी चौकशी केली. त्यानंतर अरुण गवळीने बीएचे विषय निवडल्याचं विभागीय संचालक डॉ पी शिवस्वरूप यांनी सांगितले.