पटनामध्ये (Patna) श्री गुरु गोविंद सिंह हॉस्पिटल (Shree Guru Govind Singh Hospital) जवळचे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मॅजिस्ट्रेटला पोलिसांच्या उपस्थितीत लोकांनी खेचून नेत मारले. (Attack On Magistrate) त्याला शिव्या दिल्या. गर्दीचे आक्रोश पाहून त्यांच्यासोबतचे इतर लोक पळून गेले.नगर निगमच्या अजीमाबाद भागाचे कार्यपालक पदाधिकाली नुरुल हक शिवानी यांनी सांगितले की अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या टीमसोबत मारामारी करण्यात आली.
[read_also content=”पत्रकार राणा आयुब यांच्यावर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा आरोप, जप्त करण्यात आले चक्क १.७७ कोटी रुपये https://www.navarashtra.com/latest-news/money-landerung-case-against-rana-ayyub-1-crore-77-lakh-seized-by-ed-nrsr-236314.html”]
याची माहिती एसडीओ आणि नगर आयुक्तांना देण्यात आली आहे. नगर निगमच्या जमिनीवर बनवण्यात आलेल्या संप हाऊसच्या जवळ अतिक्रमण हटवण्यासाठी डिएमच्या आदेशानुसार मॅजिस्ट्रेट, पोलीस आणि नगर निगम अधिकारी आणि कर्मचारी जेसीबीसह गुरुवारी दुपारी तिथे पोहोचले होते.त्यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. खूप वेळ तणावाचे वातावरण होते. त्या भूखंडावर जलपूर्ती केंद्र बनवण्याची योजना प्रस्तावित आहे. अतिक्रमणामुळे हे काम होऊ शकलेले नाही.