इतिहासाची पुनरावृत्ती नकोच! पाकिस्तानप्रमाणेच आता बांगलादेशातील मंदिरांवर हल्ले

हिंदू धर्म सहिष्णू आहे. हिंदू धर्मात ज्याप्रमाणे सहिष्णुता आहे, तशाप्रकारची सहिष्णुता अन्य कोणत्याही धर्मात आढळून येत नाही. काही धर्मातील कट्टरपंथी अनुयायी नेहमीच हिंदू मंदिरांची तोडफोड करतात.
Miscreants attack Hindu temples in Bangladesh
Published on: 
Updated on: 

इतिहास बघितला तर महंमद गजनवीपासून तर औरंगजेबापर्यंत सर्वच मोगल सम्राटांनी हिंदू मंदिराची तोडफोड केलेली आहे. महंमद गजनवी यांनी सोमनाथ मंदिर उद्धवस्त केले होते. सरदार पटेल आणि के. एम. मुंशी यांनी सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण केले. मुस्लिम मूर्तिपूजक हिंदूंना 'काफिर' म्हणतात. मुस्लिम खिश्चन धर्मप्रसारक हिंदूचे धर्मांतरण करून आपल्या धर्मात सामील करून घेतात. त्यासाठी ते हिंसा, प्रलोभन आणि छळ-कपटाचाही वापर करतात.

गरीब आदिवासींच्या धर्मांतरण प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नियोगी आयोगांची स्थापना करण्यात आली होती. हिंदू सहिष्णू असतात त्यामुळेच ते कधी कोणाला जबरदस्तीने किंवा प्रलोभने दाखवून हिंदू धर्मात सहभागी करून घेत नाहीत. परंतु, मुस्लिम किंवा खिश्चन धर्मप्रसारक प्रलोभने दाखवून हिंदूंना त्यांच्या धर्मात सहभागी होण्यास भाग पाडतात.

जेव्हा अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती, तेव्हा बांगलादेशातील अनेक मंदिराची तोडफोड करण्यात आली आणि हिंदूवर अमानुष अत्याचार करण्यात आले होते. तस्लिमा नसरीनने त्यांच्या 'लज्जा' या पुस्तकात या सर्व मंदिरांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे. पाकिस्तानमध्ये तर हिंदू मुलींचे अपहरण करून धर्मांतर करण्यात येते व त्यानंतर त्यांच्यासोबत 'निकाह' लावण्यात येतो. अशा घटनांकडे तेथील पोलिससुद्धा दुर्लक्ष करतात.

पाकिस्तानप्रमाणेच आता बांगलादेशातील हिंदू मंदिरावर हल्ले होत असून तेथील मंदिरांची तोडफोड करण्यात येत आहे. पाकिस्तानमध्ये गणेश मंदिराची तोडफोड केल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदूंनी मोर्चे काढले होते. तेथील शीख, पारसी, ख्रिश्चन बांधवांनीही हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याबद्दल तीत्र संताप व्यक्त केला आहे.

आता बांगळादेशातील खुलना जिल्ह्यातील कट्टरवाद्यांनी ५० पेक्षाही जास्त हिंदूंची घरे आणि दुकानांची तोडफोड केलेली आहे. तेथील ४ मंदिरे तर जमीनदोस्त करून टाकली आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चनांवर सतत हल्ले होत आहेत. मार्चमध्ये पंतप्रधान मोदी जेव्हा बांगलादेशाच्या दौर्‍यावर गेले होते, तेव्हा त्यांना विरोध करण्यात आला. बांगलादेशात हिफाजत-ए-इस्लाम नावाची हिंदूविरोधी संघटना वेगाने वाढू लागली आहे.

Attacks on temples in Bangladesh now like in Pakistan