नवी दिल्ली : भारती एअरटेलने 5जी नेटवर्कचे ट्रायल गुरुग्राममध्ये सुरु केले आहेत. भारत सरकारने मे मध्ये भारतीय टेलीकॉम कंपन्यांना 5G च्या ट्रायल्सची मंजुरी दिली होती. या ट्रायल साईटवर कंपनीने 3500MHz बॅंडचा वापर करून 5G ची चाचणी केली आहे आणि या यातून 1Gbps इतका वेगवान स्पीड मिळाला आहे.
एअरटेलचे 5G नेटवर्क गुरुग्राममधील सायबर हबमध्ये सुरु करण्यात आले आहे, ही माहिती 91mobiles च्या माध्यमातून समोर आली आहे. यानंतर कंपनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगलोरमध्ये देखील अशाच प्रकारचे ट्रायल करणार आहे.
Breaking: @reliancejio से पहले @airtelindia का #5G ट्रायल शुरू, भूल जाएंगे 4G की स्पीड pic.twitter.com/rP0zh7ki9a
— 91mobilesHindi (@91mobilesHi) June 14, 2021
एअरटेलच्या या ट्रायलमध्ये 5जी नेटवर्कवर 1Gbps पेक्षा जास्त स्पीड मिळाला आहे. सध्या देशात उपलब्ध असलेल्या 4G नेटवर्कपेक्षा हा वेग कितीतरी जास्त आहे. कंपनीने Qualcomm सोबत 5G साठी भागेदारी केली आहे. एअरटेल भारतात Qualcomm 5G RAN वर आधारित 5G नेटवर्क घेऊन येणार आहे.
डिपार्टमेंट ऑफ टेलीकॉम्युनिकेशनने टेलीकॉम कंपन्यांना शहरांसोबत ग्रामीण भागात देखील 5G चे ट्रायल करण्यास सांगितले आहे. डिपार्टमेंटने 4 मे, 2021 रोजी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि MTNL ला 5G ट्रायल्स करण्याची मंजुरी दिली होती.
bharti airtel more faster 5g trial gurugram got over 1gbps speed testing