टीम इंडियाची कर्णधार मिताली राजच्या (Mitali raj) जीवनावर आधारीत लवकरच बायोपिक येत असून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. ‘शाब्बास मिथू’ (Shabbas mithu) असे या सिनेमाचे नाव असणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिखही समोर आली आहे. नुकतंच सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. सिनेमात तापसी पन्नू (Tapasi pannu) मितालीच्या भूमिकेत झळकली आहे. तापसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रकाशित केले आहे. विशेष म्हणजे महिला दिनाचं औचित्य साधून हे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात हेल्मेट घेतलेली मिताली राज म्हणजेच तापसी पन्नू दिसून येत आहे. माझ्यासारख्या लाखो युवतींची ती प्रेरणा आहे, काही रुढी-परंपरांना मोडून, पुढे जाण्यासाठी अनेकांना तिने रस्ता दाखवला आहे. महिला दिनानिमित्ताने या लढाईत लढणाऱ्या सर्व महिलांसाठी मी चीअर करते, असे कॅप्शन तापसीने ट्विटमध्ये दिले आहे. सध्या, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.