एक रुपयाही भांडवल न गुंतवता सुरु करा हा व्यवसाय; ...कमाईची पुर्ण गॅरंटी!
तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करताय. मात्र, त्यासाठी पैसे नाहीत. मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हांला एक बिझनेस आयडिया सांगणार आहे. ज्यामध्ये तुम्ही एक पैसाही न गुंतवता भरपूर कमाई करू शकतात. विचारात पडलात ना… होय, हे होऊ शकते आणि यासाठी तुम्हांला तुमचे स्वतःचे थ्रिफ्ट स्टोअर सुरु करावे लागणार आहे. ज्यामध्ये तुम्ही अशा वस्तू विक्रीसाठी ठेवू शकतात. ज्या लोकांच्या घरातील स्टोअर रूममध्ये वापराविना पडून असतात अर्थात अडगळीत पडून असतात. परंतु, काही गरजू व्यक्तींना उपयोगी पडू शकतात. याच पार्श्वभुमीवर आज आपण या व्यवसायाबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत…
सोशल मीडीयाचा प्रभावी वापर करू शकतात
सामान्यपणे प्रत्येकाकडे घरात स्टोअर रूम असतात. ज्यात अशा अनेक वस्तू ठेवलेल्या असतात. ज्या चांगल्या स्थितीत असूनही वापरल्या जात नाहीत. यामध्ये इलेक्ट्रिक प्रेस, टीव्ही, वॉशिंग मशिन यांसारख्या वस्तूंचे नवीन मॉडेल खरेदी केल्यानंतर लोक या जुन्या वस्तू वापरत नाही. त्यामुळे त्या धुळखात पडतात. त्यामुळे तुम्हांला अशा अडगळीत पडलेल्या मात्र, जुन्या वस्तू असलेल्यांवर नजर ठेवावी लागणार आहे. यासाठी तुम्ही सोशल मीडीयाचा प्रभावी वापर करू शकतात.
(फोटो सौजन्य – istock)
हे देखील वाचा – इलेक्ट्रिक वाहनांबाबत नितीन गडकरींचे मोठे विधान; चीनला देणार धोबीपछाड!
जुन्या पुस्तकांच्या विक्रीच्या तत्वावर आधारित
दरम्यान, ज्या पद्धतीने जुन्या पुस्तकांची विक्री होते. अगदी त्याच तत्वावर तुमची ही दुकान चालणार आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक कुटूंब काटकसरीने राहतात. त्यामुळे वापरलेल्या उत्पादनांची मागणी खूप वाढली आहे. कार-बाईकपासून ते घरगुती वापरापर्यंत वापरलेली उत्पादने ऑनलाइन आणि ऑफलाइन विकली जात आहेत. अनेक गरजू लोक असतात. ज्यांना या वस्तूंची गरज असते. परंतु, पैशांच्या कमतरतेमुळे ते नवीन वस्तुंची खरेदी करू शकत नाहीत. मात्र, हेच ग्राहक तुमच्या थ्रिफ्ट स्टोअरमधून नाममात्र किमतीत अशा वस्तू खरेदी करू शकतात.
कसा चालणार व्यवसाय
तुम्हांला अडगळीत पडून असलेल्या व्यक्तींशी बोलायचे आहे. त्यांच्याशी डील करून, कमिशनच्या आधारावर त्यांची वस्तू तुमच्या स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवू शकतात. अर्थात तुम्ही संबंधित वस्तूच्या विक्रीनंतर पैसे देण्याचे आश्वासन देऊन, तुमच्या दुकानात आणू शकतात. त्यात तुमचे कमिशन जोडल्यानंतर, तुम्ही ती वस्तू विकू शकतात. ज्यामुळे तुम्हाला वरचेवर मार्जिन मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे हे काम तुम्ही तुमच्या घरामधूनही सुरू करू शकतात, अशा परिस्थितीत तुम्हांला दुकानाचे भाडेही द्यावे लागणार नाही. त्यामुळे तुम्हांला या व्यवसायात तोटा होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
व्यवसायात तोटा होण्याचा प्रश्नच नाही
तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करताना, लहान असो वा मोठा, सर्वात मोठी चिंता ही असते. ती व्यवसायात तुमचे नुकसान होऊ नये. त्यामुळे जुन्या वस्तू विकण्याच्या या व्यवसायात तुम्हांला तोटा होण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट तुम्ही एखादी वस्तू जास्त काळ ठेवली तर तुम्ही त्यावर तुमचे कमिशन वाढवू शकतात. त्यातून अधिकचे पैसे कमवू शकतात. साधारणपणे नागरिक 25 टक्के कमिशन देऊन, त्यांचा जुना माल अशा दुकानात विक्रीसाठी ठेवत असतात.