अनेकदा घरच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतो. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने घराबाहेर कुठे ऑफिससाठी किंवा कामानिमित्त गेलो तरी घरावर लक्ष देता येते. अनेकांचा सीसीटीव्ही कॅमेरा घेण्यामागे हाच उद्देश असतो. सीसीटीव्ही कॅमेरा घराव्यतिरिक्त अनेकजागी लावला जातो, जसे की एखाद्या दुकानामध्ये किंवा कोणत्या व्यस्त रोडवर किंवा एखाद्या मॉलमध्ये. बदलत्या काळानुसारच लोकांच्या सवयीही बदलल्या, पूर्वी अधिकतम दुकानांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरा लावला जायचा मात्र गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणासोबतच लोकांचे आपल्या घरासाठी सीसीटीव्ही कॅमेरा घेण्याचे प्रमाणही वाढले.
बाजारात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनेक मॉडल उपलब्ध आहेत. आता तुम्हाला वेगवेगळ्या फीचर्ससह आणि किमंतीसह हे सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध मिळतील. त्यामुळेच घरासाठी नक्की कोणता सीसीटीव्ही कॅमेरा लावणे फायद्याचे ठरेल, हे जाणून घेणे फार गरजेचे आहे. घरासाठी नेहमी असाच सीसीटीव्ही कॅमेरा घ्यायला हवा ज्यात आपले पैसे वाया जाणार नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हला सीसीटीव्ही कॅमेरा घेण्याआधी कोणत्या गोष्टी नीट तपासाव्या याबाबद्दलची माहिती सांगणार आहोत.
[read_also content=”POCO च्या सर्वात स्टायलिश स्मार्टफोनची धमाकेदार एन्ट्री, आता अर्ध्या तासातच फोन फुल चार्ज होईल https://www.navarashtra.com/technology/pocos-most-stylish-smartphones-entry-soon-now-the-phone-will-be-fully-charged-in-half-an-hour-536544.html”]
कॅमेरा रेंज
घरासाठी असा सीसीटीव्ही कॅमेरा घ्या जो किमान 20-25 मीटरचा आहे. जितकी मोठी रेंज असेल तितके चांगले. रेंज चांगली असेल तर दूरच्या गोष्टी टिपणे सोपे जाते. कॅमेराची रेंज ही इमेज सेन्सरच्या आकारावर तसेच लेन्सच्या फोकल लांबीवर अवलंबून असते.
व्हिडिओ रेंज
सर्वोत्कृष्ट सीसीटीव्ही कॅमेराचा व्हिडिओ 720p आणि 1080p रिझोल्यूशनसह येतो. तुम्हाला हे माहित असले पाहिजे की रिझोल्यूशन जितके जास्त असेल तितकी व्हिडिओची गुणवत्ता चांगली असेल. त्यामुळे कॅमेऱ्याची गुणवत्ता तपासणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही खरेदी करत असलेल्या कॅमेरामध्ये तुमचे पैसे वाया जाणार नाहीत.
SD कार्ड स्लॉट
CCTV कॅमेरे सहसा इनबिल्ट SD कार्ड स्लॉटसह येतात. रेकॉर्डिंगसाठी, यूज़र्सना 32GB, 64GB किंवा 128GB मिळवू शकतात. काही स्वस्त सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनल स्टोरेजसह प्रदान केलेले नाहीत. त्यामुळे नेहमी SD कार्ड देणारा कॅमेरा खरेदी करा.
मोशन सेन्सर
जर तुम्ही थोड्या जास्तीचा खर्च करू शकत असाल, तर मोशन सेन्सर देणारे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करा. अशा कॅमेऱ्यांची किंमत इतरांपेक्षा थोडी जास्त असली तरी हे सेन्सर कोणताही अनावश्यक आवाज किंवा हालचाल ओळखून ॲपद्वारे यूजर्सना सतर्क करू शकतात.