फोटो सौजन्य- iStock
सीए (चार्टर्ड अकाउंटंट) च्या फाऊंडेशन कोर्स संबंधी मोठी घोषणा करण्यात आली आहे. इस्टीटुट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI) द्वारे सीए फाऊंडेशनचा निकाल सोमवार 29 जुलैला घोषित केला जाणार आहे. सीए फाऊंडेशनला बसलेले परीक्षार्थी icai.org, icai.nic.in आणि icaiexam.icai.org वर निकाल पाहू शकतात. CA फांऊडेशन ही परीक्षा ICAI तर्फे 20,22,26,28 जून 2024 रोजी आयोजित केल्या होत्या. या परीक्षेला 1.2 लाखाहून जास्त परीक्षार्थी बसले होते.
स्कोअरकार्ड पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन क्रेडेंशियल्स आवश्यक आहेत. सीए फाऊंडेशनच्या निकालाबरोबर ICAI कडून सीए फाऊंडेशनच्या टॉपर्सची नावे आणि त्यांचे मार्क देखील जाहीर केले जाणार आहे. CA फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, परीक्षार्थींनी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% आणि एकूण 55% गुण मिळवणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा- आयात-निर्यात (Import-Export) क्षेत्रात प्रवेश करा, जगभरातील असंख्य संधीं मिळवा!
मागील सीए फाऊंडेशन (CA Foundation) परीक्षेचे उतीर्ण होण्याचे प्रमाण
गेल्या सत्रातील निकालाबाबत बोलायचे झाल्यास CA फाउंडेशन परीक्षेत 29.99% उमेदवार यशस्वी झाले होते, ज्यामध्ये मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 30.19% होती तर मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 29.77% होती. या निकालामध्ये मुलांची टक्केवारी वाढते की मुलींची हे पाहणे महत्वाचे असेल. मागील पाच वर्षांतील उत्तीर्णतेची टक्केवारी पाहिली तर, डिसेंबर 2023 मध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 29.99 टक्के, जून 2023 मध्ये 24.98 टक्के, डिसेंबर 2022 मध्ये 29.25 टक्के, जून 2022 मध्ये 25.28 टक्के आणि डिसेंबर 2021 मध्ये 30.28 टक्के होती.
सीए (CA) कोर्सचे पूर्ण स्वरुप
सीए फाऊडेशन उतीर्ण उमेदवार हा सीए इंटर्न या पुढील परीक्षेच्या नोदंणीसाठी पात्र ठरतो. सीए इंटर्न ही सीए अभ्यासक्रमातील दुसऱ्या स्तरावरील परीक्षा आहे. त्यानंतर सीएची मुख्य परीक्षा असते ती पात्र झाल्यास उमेदवार हा सीए बनतो. त्यादरम्यान 3 वर्षे उमेदवारास आर्टकलशीप करावी लागते.