ग्वाल्हेर : भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांना ग्वाल्हेरमध्ये विरोधाचा सामना करावा लागला. एनएसयुआयने ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदेचा ताफा थांबवला. आणि ज्योतिरादित्यांना (Jyotiraditya Scindia angry) बेशर्माची फुलं आणि धिक्कार पत्र सोपवलं. शिंदे यांनी सुरुवातील आपलं कार्यकर्ता समजून गाडी थांबवली होती, मात्र हातात पत्र घेताना ते चिडले होते आणि फुलं परत करुन पुढे निघून गेले.
राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य सध्या तीन दिवसांच्या अंचल दौऱ्यावर होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोणत्याही नेत्याचाही अंचलमध्ये पहिलाच दौरा होता. संपूर्ण कोरोना काळात बेपत्ता असलेल्या ज्योतिरादित्यांचा येथे पहिल्यापासूनच विरोध होत होता. मात्र त्यांच्या दौऱ्याची सुरक्षा व्यवस्था कडक होती. पोलीस कोणालाही त्यांच्याजवळ जाऊ देत नव्हते. शुक्रवारी एएसयुआयचा नेता वंश माहेश्वरी याला पोलिसांनी नजरबंद केलं होतं.
[read_also content=”दोन दिवस पावसानं धुमशान घातल्यानंतर आता मुंबईकरांना थोडा दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-rains-alert-imd-weather-report-raigad-ratnagiri-navi-mumbai-heavy-rainfall-today-weather-updates-nrvb-141643.html”]
एएसयूआयचे प्रमुख नेते सचिन द्विवेदी यांचा तपास सुरू होता. तीन दिवस विरोधापासून बचाव करीत शिंदे ग्वाल्हेरमध्ये राहिले. मात्र शहरातून बाहेर जाण्यापूर्वी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. शनिवारी सकाळी १०.३० वाजता शिंदे आपल्या कारमधून रस्तेमार्गाने दिल्लीला रवाना होत होते. त्यावेळी गोलाच्या मंदिराजवळ NSUI चे कार्यकर्ता नेता सचिन कुमारच्या नेतृत्वात एकत्र झाले होते.
[read_also content=”Corona Updates : आता मेंदूत Black Fungus घालतोय धिंगाणा; क्रिकेटच्या चेंडू एवढा ब्लॅक फंगस मेंदूतून काढण्यात डॉक्टरांना यश https://www.navarashtra.com/latest-news/corona-updates-black-fungus-in-the-brain-doctors-succeed-in-removing-black-fungus-from-the-brain-as-much-as-a-cricket-ball-nrvb-141648.html”]
गोला मंदिराच्या चौकात शिंदेंची कार पोहोचताच एनएसयूआयच्या लोकांना त्यांना घेरलं. शिंदेंना वाटलं की हे त्यांचे समर्थक आहेत. त्यानंतर शिंदेंनी गाडीची काच खाली घेतली. त्याचवेळी जमा झालेल्यांनी घोषणाबाजी सुरू केली. NSUI नेता सचिन यांनी शिंदेना बेशरमेची फुलं आणि धिक्कार पत्र सोपवलं. धिक्कार पत्र वाचून शिंदे चिडले आणि काच वर करून निघून गेले.
car winds down for the supporters but after seeing the gift given to Jyotiraditya Shinde he was overwhelmed