कोरोनामुळे(Corona) बारावीच्या परीक्षा रद्द(Twelfth Exam Cancelled) करण्यात आल्या आहेत. आता सीबीएसईने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला(CBSE Submitted Evaluation Criteria To Supreme Court) सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे. या फॉर्म्युल्याच्या आधारावर आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन(Twelfth Student Evaluation) करण्याची शिफारस सीबीएसई बोर्डाकडून करण्यात आली आहे.
निकालाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ सदस्यांची एक समिती गठीत कऱण्यात आली होती. या समितीने हा मूल्यमापनाचा फॉर्म्युला सादर केला आहे.
CBSE submitted before Supreme Court its evaluation criteria for awarding grades/marks for Class XII exams.
For class X & XI, marks in best of 3 from 5 papers in term exams will be considered. For Class XII, marks obtained in unit, term & practicals will be taken into account. pic.twitter.com/gowYPc7zEm
— ANI (@ANI) June 17, 2021
मिळालेल्या माहितीनुसार ३१ जुलैला सीबीएसईचे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.
[read_also content=”डहाणूमधील फटाक्यांच्या कंपनीत मोठा स्फोट, १५ ते २० किलोमीटरचा परिसर हादरला – अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल https://www.navarashtra.com/palghar-news-marathi/blast-at-firework-company-of-dahanu-nrsr-143454/”]
मुल्यमापनासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर ३० टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल.त्यानंतर ३० टक्के गुण असतील ते अकरावीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले ४० टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि पूर्व परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.