मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळे जण आपापली भूमिका मांडत असताना छत्रपती संभाजीराजे(Chatrapati sambhajiraje) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी नक्की काय पाऊल उचलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
#मराठा_आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन…. — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 18, 2021
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केले होते. न्यायालयाच्या निकालानंतर संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती. केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे म्हणाले होतेे.
[read_also content=”‘वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?’, तौक्ते चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीवरून निलेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर केली टीका https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/nilesh-rane-criticized-aaditya-thakre-after-water-logging-in-varli-nrsr-130618/”]
गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण सातत्याने तापताना दिसत आहे. मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. अशावेळी छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत (Maratha Morcha) भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी पत्रक काढून यासंदर्भातील घोषणा केली होती.