
पिंपरी: मोहननगर कमान ते मेहता हॉस्पिटल दरम्यान सुरु असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दहशतीच्या जोरावर काम सुरू आहे. नागरिकांना दमदाटी केली जात आहे. रस्तेकाम रखडविल्याप्रकरणाची सखोल चौकशी करून अधिकारी, सल्लागार, ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, मोहननगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज कमान ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे आदेश १७ जुलै १९ रोजी इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. या कामाची मुदत २४ महिने म्हणजेच १६ जुलै २१ पर्यंत होती. मात्र या मुदतीत संबंधित ठेकेदाराने केवळ ६५ टक्के काम पूर्ण केले आहे. तीन दिवसांपूर्वी मारुती मंदिर या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अर्धा जुना रस्ता खोदकाम सुरू होते. दुसNया बाजूला पूर्ण झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर डंपर उभा होता. या ट्रकमध्ये जेसीबीच्या साह्याने राडारोडा भरला जात होता. कमान अथवा ईएसआय चौकात बॅरिकेट्स अथवा फलक नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने येऊन रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. ठेकेदाराचे कर्मचारी वाहनचालकांना दमदाटी करत होते. मोठी कसरत करून वाहनचालकांना मागे फिरावे लागत होते.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स का लावले नाहीत ? लोकांना त्रास होत आहे ?तुम्ही थोडा वेळ काम बंद करून दोन्ही बाजूने बॅरिकेट लावा आणि मग काम सुरू करा अशी विनंती केली असता काम थांबणार नाही ? तुम्हाला माहिती आहे का हे काम कोणाचे आहे ? तुम्हाला काय करायचे ते करा अशी दुरुत्तरे ठेकेदाराचे कर्मचारी करत होती. विकास कामे सुरु असताना मोहननगर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कुठलीही काळजी घेतली जात नाही. रस्त्याच्या कडेला सेफ्टीटेप, बॅरिकेट्स आणि रिफ्लेक्टर लावले नाहीत. तसेच हे काम सुरू असताना कामात काळजी न घेता अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तोडण्यात आल्या आहेत. भूमिगत विद्युत तारा वेळोवेळी तोडल्याचा आरोपही मारुती भापकर यांनी केला. नागरिकांना होणाNया त्रासाबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. परिसरातील नागरिकांचे जीवन सुरक्षित करावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, सल्लागार, ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भापकर यांनी केली आहे.