
दिल्ली: आधी इंस्टाग्रामवर मैत्री,त्यांनतर सेक्सटिंग,नंतर मुलींना नग्न छायाचित्रे पाठवला सांगून ती मिळाल्यावर मुलींना ब्लॅकमेल () करणे या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलाला पोलिसांकडून अटक. हे चित्रपट किंवा वेब सिरिजची कथा नसून असं प्रत्यक्षात घडलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इंस्टाग्रामवर दिल्लीतील मुलींना लक्ष्य केले होते. त्यांच्याशी मैत्री, सेक्सटिंग केल्यानंतर तो नग्न छायाचित्रे मागितया आणि त्या फोटोवरुन मुलींना ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
[read_also content=”भीकेला लागलेल्या पाकिस्तान! एका डॉलरसाठी मोजावे लागत आहेत भारताच्या तुलनेत तिप्पट पैसे, श्रीलंकेसारखी स्थिती होणार का? https://www.navarashtra.com/world/due-to-economic-currency-pakistani-currency-going-down-as-compare-to-u-s-dollar-nrps-364834.html”]
घटना दिल्लीतील आहे. एका 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अल्पवयीन मुलीशी मैत्री केल्यानंतर तिचा पाठलाग करून तिचा छळ केल्याप्रकरणी आणि तिला इंस्टाग्रामवर नग्न फोटो शेअर करण्यास भाग पाडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या 14 वर्षांच्या मुलीशी मैत्री केली आणि नंतर तिला नग्न फोटो शेअर करून आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्याची मागणी केली. तसे न केल्यास त्याचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित करू, अशी धमकी आरोपीने दिली. पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली.
तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की त्यांच्या मुलीने इंस्टाग्राम चॅट दरम्यान तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ कोणाशीतरी शेअर केले होते. या वरुन तो मुलगा तिला वांरवांर धमकावत होता,आणि आता ते व्हिडिओ प्रसारित होण्याची भीती होती. दरम्यान, पोलिसांनी पिडित मुलीला विश्वासात घेऊन विचारले असात तिने सांगितले की, तिने तिचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका मित्रासोबत शेअर केले होते, त्यानंतर त्याने तिच्यावर सेक्सटिंग करण्यासाठी म्हणत होता तसेच तिला असे आणखी फोटो पाठवण्यास सांगितले होते.
पोलिसांनी सांगितले की, अल्पवयीन मुलीच्या जबानीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त (उत्तर) सागर सिंग कलसी यांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी कथित इन्स्टाग्राम प्रोफाइलचा IP पत्ता, संबंधित मोबाइल नंबर आणि इतर संबंधित तपशील मिळवले. या आयपी पत्त्याचा तपशील संबंधित मोबाइल ऑपरेटरकडून (कंपनी) मिळवण्यात आला आणि त्या व्यक्तीची ओळख पटली. ते म्हणाले की, पोलिस जेव्हा पत्त्यावर पोहोचले तेव्हा त्यांच्या वडिलांच्या नावावर सिमकार्ड नोंदवल्याचे आढळून आले. त्यानुसार मुलगा (आरोपी) त्यावेळी घरी नसल्यामुळे त्याच्या वडिलांना त्याला पोलिसांसमोर हजर करण्यास सांगितले आहे.