पंढरपूर : पंढरपुरात दोन वर्षानंतर माघी यात्रेचा (Maghi Yatra Pandharpur) सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. विठ्ठल भक्तांच्या गर्दीमुळे मुखदर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत गेली आहे.
माघ वारी शनिवारी (दि.१२) साजरी होणार आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्याने ही वारी होणार आहे. गेल्यावर्षी ही वारी भरली नव्हती. त्यामुळे पंढरपुरात आता भाविकांची गर्दी होत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देवाच्या मुख दर्शनासाठी दर्शन रांग तयार केली आहे. चार पत्रा शेड तयार केले आहेत. दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी, चहा दिला जाणार आहे. तसेच स्वच्छ्तागृहे तयार केली आहेत. भाविकांनी कोरोना नियम पाळून दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीने केली आहे.