तेल्हारा (Telhara): आपसी वादातून गावातील काही दबंग लोकांनी (domineering people) वडील आणि 30 वर्षीय मुलाला बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिस स्टेशन (Telhara police station) अंतर्गत येणाऱ्या भांबेरी या गावात (in Bhamberi village) ही घडना घडली आहे मुलगा गंभीर जखमी अवस्थेत अकोल्यातील सर्वोपचार केंद्रात (Akola General Medical Center) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयित आरोपींना अटक केली आहे.
[read_also content=”नागपूर/ विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी निधी खर्च करायला पैसे नाही; पण महाज्योतीकडून मुख्यालयाच्या बांधकामासाठी ३६ लाखांचा खर्च https://www.navarashtra.com/latest-news/there-is-no-money-to-spend-on-funding-for-student-training-but-mahajyoti-spent-rs-36-lakh-for-the-construction-of-the-headquarters-nrat-135640.html”]
तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावात सुत्रांनकडून मिळालेल्या माहिती नुसार भांबेरी येथील देविदास भोजने आपल्या परिवारासोबत राहतात. गावात आपसी वाद बऱ्याच वर्षापासून सुरू होता. आज पहाटेच्या सुमारास हा वाद विकोपाला गेल्याने अंदाजे ७० वर्षीय देविदास भोजने यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने जबरदस्त प्रहार केल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवीदास भोजने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर देविदास भोजने यांचा मुलगा तीस वर्षीय अजय भोजने याला देखील जबर मारहाण करण्यात आली.
त्या अवस्थेत पडलेल्या अजय भोजने याला तात्काळ उपचारासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात आणले असता स्थानिक डॉक्टरांनी अकोला रुग्णालय येथे हलवण्याचे सांगितले. सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तेथे अजयचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत तीन संडञायित आरोपीला अटक केली असून नेमकी ही हत्या कोणी व का केली याचा तपास सुरू आहे. आज सकाळी घडलेल्या या हत्याकांडाने येणारा परिसर हादरून आहे.