मुंबई: तौक्ते चक्रीवादळाने(Cyclone tauktae) मुंबईला जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे(Rain) मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले. याचा फटका वाहतुकीला बसला. शहरात साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या १०९ बस(Best bus damaged) बिघडल्या होत्या. नादुरुस्त झालेल्या ६० हून अधिक बसेसची दुरुस्ती झाली असून उर्वरित बसेसच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे.
[read_also content=”मुंबई महापालिकेने १२०० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर केले खरेदी, बाजारभावापेक्षा जास्त भावाने झाला व्यवहार https://www.navarashtra.com/latest-news/1200-oxygen-concentrator-purchased-y-bmc-with-double-rate-nrsr-130748.html”]
मुंबईत सोमवारी चक्रीवादळामुळे बेस्ट उपक्रमाच्या सेवेवरही परिणाम झाला. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा आणि परिवहन विभागांना चक्रीवादळाने झळ बसली. वादळी पाऊस असतानाही बेस्टने दिवसभरात ३,३१२ बसेस चालवून सेवा दिली. मात्र वादळी वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे १०९ बसेस नादुरुस्त झाल्या. तर सुमारे ६० ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी आल्या. या तक्रारीही उपक्रमाने दूर करून वीजपुरवठा सुरळीत केला.
हिंदमाता, गोरेगावमधील शास्त्रीनगर, गांधी मार्केट, कुर्ला पश्चिमेतील शीतल सिनेमा, वडाळा पूल, दहिसर सबवे, स्वामी नारायण मंदिर आदी अनेक भागात पाणी साचल्याने तिथे बससेवा चालविणे अवघड ठरले. त्यामुळे त्या बसचा मार्ग बदलून त्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.