
नेवासा : बेलपिंपळगांव सबस्टेशन परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांनी दोन महिण्यात एक कोटी रुपयांचा विज बिल भरणा करुनही शेतकऱ्यांचे विजजोड तोडल्यामुळे बेलपिंपळगांव, पुनतगांव,बेलपांढरी,भालगांव गोधेगांव परिसरातील शेतकरी अधिक आक्रमक होत शुक्रवार (दि.११) रोजी सकाळी ११ वाजता नेवासा तहसिलदारांना निवेदन देवून चिडलेल्या शेतकऱ्यांनी आपला नेवासा मोर्चा महावितरण कार्यालयाकडे वळविला महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत उपस्थित अधिकाऱ्यांना वीज बंद का केली ? असा परखड सवाल करत शेतकरी यावेळी अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले.
शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु असतांना नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार महावितरण कार्यालयात आले असता संतप्त शेतकऱ्यांनी आम्ही १३ गांवाच्या शेतकऱ्यांनी दोन महिण्यात एक कोटी रुपयाचा भरणा करुनही विज बंद केल्याचे वास्तव यावेळी उपस्थित आक्रमक शेतकऱ्यांनी पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांना सांगितले पोलिस निरिक्षक पोवार यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सबुरीने घेण्याचे सुचविले असता पुन्हा विज सुरु करण्यात आली. या आंदोलनाचे नेत्तृत्व भाजपाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी केले यावेळी आंदोलकांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्यामुळे शेतकऱ्या अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.
महावितरणच्या सुलतानी वसुलीच्या कारभाराविरुद्ध भाजपाने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी खासदार तुकाराम गडाख यांच्यावतीने सोमवार (दि.१४) रोजी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले असतांनाच तीन दिवस आधीच नेवासा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी ठिय्या आंदोलन करुन बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरु केल्यामुळे राजकिय रणांगणात चांगलेच चर्चेचे काहुर निर्माण झाले आहे.
याबाबत तालुकाध्यक्ष पेचे यांना आपला १४ तारखेला मोर्चा आहे मग त्या मोर्चाचे काय ? असा सवाल केला असता हे निवेदन माजी आमदार मुरकुटे यांनी दिलेलेच आहे माञ आमच्या १३ गावांनी दोन महिण्यात एक कोटी रुपये विजबिल भरणा केलेला असतांनीही आमचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे आम्ही आंदोलन हाती घेतल्याचे पेचे यांनी सांगितलेले आहे.