मुंबई : लतादीदींच्या करिअरवर, गीतांवर अनेक पुस्तक आली. पण लतादीदींनी स्वत: कधी आत्मचरित्र लिहलं नाही. मी कधी आत्मचरित्र लिहणार नाही असं मत लतादीदींनी व्यक्त केलं होतं. याच कारण विचारल्यावर लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकतर जुने संगीतकार आणि गायक आता कोणी राहिलेलं नाहीत. तसंच काही लोकांच्या भावना दुखावले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कधी आत्मचरित्र लिहलं नाही.
तर दुसरीकडे आशाताईंनी मात्र स्वत:च आत्मचरित्र लिहून ठेवलं आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही आवृत्ती तयार आहेत. पण त्या अजून प्रकाशित झालेल्या नाही.
लतादीदींचा मूळचा जन्म इंदौरचा. त्यामुळे इंदौरबद्दल एक जिव्हाळा होता त्यांना . त्यांना इंदौरमधील ‘५६ भोग’ ही खाऊ गल्ली फार आवडायची. येथील गुलाबजाम, रबडी आणि गोड्याचे पदार्थ त्या आवडीने खायच्या इंदाैरहून जे कुणी त्यांना भेटायला यायचे, त्यांना त्या खाऊ गल्लीबद्दल आवर्जून विचारायचे. ‘सराफा बाजार अजून तसाच आहे का’ असं त्या आवर्जून विचारायच्या.