Gautam Gambhir become Team India head Coach
Gautam Gambhir Became Coach of Team India : भारतीय क्रिकेट संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. बीसीसीआयने गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली आहे. राहुल द्रविडच्या जागी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे. 42 वर्षीय गंभीर हा 2007 आणि 2011 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. यासोबतच त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएल २०२४ चे विजेतेपद पटकावले. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता दोन वेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे.
बीसीसीआय सचिव जय शहा यांची पोस्ट
It is with immense pleasure that I welcome Mr @GautamGambhir as the new Head Coach of the Indian Cricket Team. Modern-day cricket has evolved rapidly, and Gautam has witnessed this changing landscape up close. Having endured the grind and excelled in various roles throughout his… pic.twitter.com/bvXyP47kqJ
— Jay Shah (@JayShah) July 9, 2024
जय शहा यांनी केली पोस्ट
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची घोषणा केली. त्याने लिहिले की, भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आधुनिक काळात क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतम गंभीर हा या बदलत्या परिस्थितीचा जवळून साक्षीदार आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक आव्हानांना तोंड देत आपली भूमिका चोख बजावली आहे. मला विश्वास आहे की, भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी गौतम हा आदर्श व्यक्ती आहे.
गौतम गंभीरला कोचिंगचा चांगला अनुभव
गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएलमध्ये आपल्या कोचिंग करिअरची सुरुवात केली. तो 2022 मध्ये संघात मार्गदर्शक म्हणून सामील झाला. लखनौने आपला पहिला हंगाम खेळत सलग दोन मोसमात प्लेऑफ गाठले होते. यानंतर तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील झाला. KKR ने IPL 2024 चे विजेतेपद पटकावले. तेव्हापासून गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या येत होत्या.
गौतम गंभीरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
गौतम गंभीरने 2003 मध्ये भारतासाठी पहिला सामना खेळला होता. आपल्या कारकिर्दीत त्याने 58 कसोटी, 147 एकदिवसीय आणि 37 टी-20 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १० हजारांहून अधिक धावा आहेत. 2016 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळलेल्या गंभीरने 2018 मध्ये निवृत्ती जाहीर केली होती.