Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या मदतीसाठी गोकुळ उभारणार ऑक्सिजन प्रकल्प; नवनिर्वाचित शाहू शेतकरी आघाडीतर्फे मुंबई बाजारपेठेसाठी गोकुळ डेअरीच्या महत्वाकांक्षी योजना

गृह आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले सतेज पाटील यांनी मुंबईत गोकुळ ब्रॅण्डचा आणखी विस्तार करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दुग्धउत्पादक सहकारी संघाने दुधखरेदीच्या किंमतीत वाढ करण्याचे ठरविले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: May 15, 2021 | 08:30 AM
महाराष्ट्राच्या मदतीसाठी गोकुळ उभारणार ऑक्सिजन प्रकल्प; नवनिर्वाचित शाहू शेतकरी आघाडीतर्फे मुंबई बाजारपेठेसाठी गोकुळ डेअरीच्या महत्वाकांक्षी योजना
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुग्धउत्पादक संघावर निवडून आलेल्या शाहू शेतकरी आघाडी आणि या आघाडीचे नेते व राज्यमंत्री असलेले काँग्रेसचे सतेज पाटील यांनी दूध संघाचा प्रसिध्द ब्रॅण्ड असलेल्या गोकुळसाठी अतिशय आक्रमक पध्दतीने विक्री आणि वितरण करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली आहे. तसेच सध्याच्या कोवीड-१९ महामारीत ऑक्सिजन तुटवड्यामुळे अडचणीत असलेल्या सर्वसामान्य रुग्णांचाच्या मदतीसाठी गोकुळ प्रकल्पाच्या आवारातच लवकरात लवकर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचीही घोषणा केली आहे. तसेच गोकुळला दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच दूधदरात दोन रुपयांनी वाढ करण्याचेही जाहीर केले आहे.

सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलीक आदींचा समावेश आहे. या आघाडीने गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात २१ पैकी १७ जागा जिंकत दुग्धउत्पादक संघाची सत्ता मिळवली आहे.

गृह आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले सतेज पाटील यांनी मुंबईत गोकुळ ब्रॅण्डचा आणखी विस्तार करण्याची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दुग्धउत्पादक सहकारी संघाने दुधखरेदीच्या किंमतीत वाढ करण्याचे ठरविले आहे. मंत्री सतेज पाटील याबाबत बोलताना म्हणाले की गोकुळला दूधपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच दूधदरात दोन रुपयांनी वाढ करण्याचेही जाहीर केले आहे. तसेच सध्याच्या कोवीड-१९ महामारीत ऑक्सिजन तुटवड्यामुळे अडचणीत असलेल्या सर्वसामान्य रुग्णांचाच्या मदतीसाठी गोकुळ प्रकल्पाच्या आवारातच लवकरात लवकर ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचीही घोषणा केली आहे.

पाकिटबंद दूध आणि अन्य दुग्धउत्पादनांच्या विक्रीत महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या बड्या ब्रॅण्डपैकी एक असलेल्या गोकुळचा महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि कर्नाटकातील बाजारपेठेतही प्रभाव आहे. अतिशय भव्य संधी असलेल्या मुंबईच्या बाजारपेठेतील आपल्या ब्रॅण्डचा आणखी विस्तार करताना यंदाच्या वर्षात उत्पादन क्षमता सध्याच्या तेवीसशे कोटी रुपयांवरुन तीन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविली जाणार आहे.

विस्तार योजनांबद्दल बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वात मोठी सक्रीय सहकारी दूध डेअरी असलेल्या गोकुळतर्फे सध्या प्रतिदिन १० ते १२ लाख लीटर दुधसंकलन केले जाते. विशेषतः मुंबई आणि पुण्यात विश्वासार्ह ग्राहकांचा पाया उभा राहिलेला आहे. मुंबईच्या बाजारपेठेत दुधविक्री वाढविण्यासाठी सध्याचे घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांची साखळी आणखी वाढविण्याची योजना गोकुळने आखली आहे. पुढील तीन ते चार वर्षात प्रतिदिन १५ लाख लीटर दुधविक्री करण्याची योजना आम्ही आखली आहे. सध्या गोकुळ दररोज सात लाख लीटर दुधाची विक्री करते.

विक्रीविस्ताराबरोबरच उत्पादनांची विक्री ऑनलाईन आणि आधुनिक व्यापार पध्दतीच्या माध्यमातून करत आपले उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्राच्या अंर्तगत भागाबरोबरच अगदी दूर असलेल्या हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातही गोकुळच्या दुधाचे वितरण करणे शक्य होणार आहे.

महामारीतही मदतीचा हात

कोल्हापूर जिल्हा दुग्धउत्पादक सहकारी संघ नेहमीच सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी सांभाळत आलेला आहे. सध्याच्या कोविड संकटाच्या काळात राज्य ऑक्सिजनच्या तुटवड्याशी झुंजत असून तो दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रत्येक पातळीवर उपाययोजना करत आहे. अशा वेळी कोल्हापूर दूग्ध उत्पादक संघही सरकारच्या मदतीसाठी पुढे धावून आला आहे. गोकुळ प्रकल्पाच्या आवारातच ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्याची घोषणा करण्यात आली असून त्यातून कोल्हापूर जिल्हातील रुग्णांची ऑक्सिजनची गरज पूर्ण केली जाणार आहे. या घोषणेने महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठीसुध्दा मदत होणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील मध्यवती भागात कार्यरत असलेल्या गोकुळचा कारभार हा खेड्यातील सहकारी दुग्ध सोसायट्यांनी निवडलेल्या संचालकांकडून पाहिला जातो. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लड मोहिमेच्या वेळी मार्च १९६३ मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ लिमिटेडचा सहकारी दूध प्रकल्प म्हणून उभारणी करताना गोकुळ ब्रॅण्डची निर्मिती केली गेली आहे. गोकुळच्या अत्याधुनिक प्रकल्पाची सध्याची क्षमता प्रतिदिन १५ लाख लीटर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातीलच शिरोळ तालुक्यातील उदगाव येथे एक उपप्रकल्प त्याचबरोबर प्रतिदिन साडेसहा लाख लीटर दुधसाठा करण्याची क्षमता असलेले चार दुग्ध शीतकरण प्रकल्प आणि नवी मुंबईत अत्याधुनिक पॅकेजिंग प्रकल्प आहे. आपल्या स्थापनेपासून गोकुळने यशाचे अनेक टप्पे पार करताना दूध संकलन, दुध प्रक्रिया, पशुआरोग्य, संकरित पशुउत्पादन, विविध उत्पादनांची निर्मिती आणि वितरण यात दबदबा निर्माण केला आहे. दुधाबरोबरच श्रीखंड, तुप, टेबल बटर, दुधभुकटी, पनीर आणि दही, ताक हे अन्य दुग्धजन्य पदाथही गोकुळ ब्रॅण्डअंर्तगत तयार केले जातात. हे सर्व उत्पादने बाजारात सदैव उपलब्ध आहेत.

गेली तीन दशके गोकुळचा कारभार हा भाजपचे नेते महादेव महाडिक आणि काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील यांच्याशी सुत असलेल्या संचालकाच्या ताब्यात होता. महाडिक हे मुळचे काँग्रेसच्या गोटातील नेते होते. यंदाच्या निवडणुकीतील प्रचारात अनेक महत्वाच्या मुद्दांवर भर देण्यात आलेला होता. त्यात गोकुळला बहुराज्यीय सहकारी संस्थेते रुपांतरित करण्याचा मुद्दाही पुढे आला. आता नवीन टीमच्या हाती गोकुळचे सुकाणू आल्याने गोकुळचे भविष्य आणखी दैदिप्यमान होणार आहे.

Gokul Dairy to set up oxygen project to help Maharashtra ambitious plans for the Mumbai market by the newly elected Shahu Shetkari Aghadi

Web Title: Gokul dairy to set up oxygen project to help maharashtra ambitious plans for the mumbai market by the newly elected shahu shetkari aghadi nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 08:30 AM

Topics:  

  • set up

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.