Glenn Maxwell Great Inning : क्रिकेटमध्ये जीवन लपलेय हे ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीने दिसून आले. माणसाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग असतात ज्यावेळी त्याच्या समोर संकटाचे डोंगर उभे असतात आणि त्यावेळी त्याच्या मनात द्वंद्व सुरू असते त्यावेळी जो हिमालयासारखा त्या संकटांना चिरडून पुढे जातो तोच ठरतो विजेता. हेच ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या खेळीतून दाखवून दिले. पराभवाच्या गर्तेत असलेली ऑस्ट्रेलिया आणि दुखापतीने स्वतः ग्रस्त असताना एखाद्या योद्धासारखा तो पिचवर खेळत होता.
मॅक्सीने मैदानावर केली चौकार षटकारांची बरसात
चौकार आणि षटकारांची बरसात त्याने मैदानावर पाडत ऑस्ट्रेलियाला विजयाची माळ घातली, ही एक अद्वितीय खेळी त्याने खेळली. मॅक्सीने 128 चेंडूत 201 धावांची खेळी करीत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सुद्धा 175 धावांची अशीच खेळी झिम्बाबेविरुद्ध केली होती, त्यावेळी आमचा जन्म नव्हता. परंतु मॅक्सीची खेळी पाहता आली.
ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीचे क्रिकेटविश्वातून कौतुक
त्याने (ग्लेन मॅक्सवेल) अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियाला सामन्यात जो खेळ केला त्याची नोंद इतिहासात कायम राहील. कोणत्याही क्रिकेटप्रेमीला हरखून नेणारी खेळी त्याने वानखेडेच्या मैदानावर साकारली. पराभवाच्या घोर अंधकारात असलेल्या ऑस्ट्रेलियाला त्याने विजयाची माळ घातली. स्वतःची डबल सेन्च्युरीदेखील त्याने केली. त्याच्या या कामगिरीचे क्रिकेटविश्वातील दिग्गजांकडून कौतुक केले गेले.
मॅक्सीकडून अलौकीक प्रतिभेचा खेळ
मैदानावर तो ज्यावेळी आला त्यावेळी ऑस्ट्रेलियालाची दयनीय अवस्था होती. त्यात त्याच्या पायाच्या दुखापतीने जोर धरला हे द्वंद्व सुरू असताना एखाद्या हिमालयासारखा उभा राहून त्याने जो खेळ केला त्याला तोड नव्हती. त्याला साथ देणारा त्याचा मित्र कमिन्स याचीसुद्धा स्तुती करणे भाग आहे. ग्लेनला स्ट्राईक मिळावी याकरिता त्याने काढलेल्या मेडन ओव्हर, त्याचबरोबर सहकाऱ्याला धावता येत नाही म्हणून एकेरी धाव टाळणे हे सर्व कमिन्सने केले. ग्लेन मॅक्सवेलने जे केले ते क्रिकेट्या पुस्तकात सुवर्णअक्षरांनी लिहले जाईल. पठ्ठ्याने 128 चेंडूत 201 धावा करून त्याच्या अलौकीक प्रतिभेची जाणीव करून दिली.
Web Title: Great innings by glenn maxwell and victory for australia nryb