Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लस उत्पादनात हाफकीन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे

लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक असून यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 20, 2021 | 03:47 PM
लस उत्पादनात हाफकीन संस्थेने पुढाकार घ्यावा : मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टियूटने पुढाकार घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यातील लसीकरण अधिक वेगाने करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज परळ येथील हाफकिन इन्स्टिटयूटला भेट दिली व प्रयोगशाळेची पहाणीही केली.  नंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संदीप राठोड, हाफकिन इन्स्टिटयूटच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. उषा पद्मनाभन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

निर्मितीचे काम हाफकीन देणे आवश्यक

लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात वेगवेगळया आजारांवरील लसींबाबत संशोधन यावर भर देणे आवश्यक असून यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. हाफकिन संस्थेने केलेले संशोधन निर्मितीकरीता येणाऱ्या काळात हाफकिन महामंडळाकडे देणे आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

स्वत:चे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी

मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले की, कोविडला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येत असून येत्या काही दिवसात महाराष्ट्रात कोविड लसीकरण करण्यावर भर  देण्यात आहे. येणाऱ्या काळात हाफकिन संस्थेचे स्वत:चे असे ‘जैव वैद्यकीय संशोधन केंद्र’ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाची मदत घ्यावी.

१५४ कोटींचा नवीन प्लांट मुंबईत होणार

हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशन आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत कोविड लसीचे उत्पादन करण्यात येणार असून त्यासाठी १५४ कोटी रुपये खर्चाचा नवीन प्लांट मुंबईत सुरु करण्यात येत आहे. देशातील काही राज्यातील वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी, लसीकरणाचा वेग वाढवता यावा याकरिता हाफकिनला लस उत्पादन करण्याची मान्यता मिळणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात यावा. उत्कृष्ट दर्जाच्या लस निर्मिती व पुरवठा करण्यावर भर देताना येणाऱ्या काळात हाफकिनने औषध निर्माण करण्याबरोरबच कोविड लस निर्मितीसाठी आयसीएमआर/भारत बायोटेक लिमिटेडकडून कोविड लसीच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.

१२६ लाख कोविड लसी हाफकिनमार्फत

कोविड लसीचे हाफकिनकडून उत्पादन करण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, हाफकिन बायो फार्मासिटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना मिशन कोवीड सुरक्षेअंतर्गत लसीची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळाल्यास  लस प्रत्यक्ष उत्पादित करता येईल किंवा फील- फिनिश  ( Fill & Finish) बेसिसवर हाफकीनला काम करता येईल, यामधून १२६ लाख कोविड लसी हाफकिनमार्फत उत्पादित होऊ शकतात असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वर्षात १३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमता

कोविड लसीच्या लवकर उपलब्धतेसाठी हाफकिन महामंडळाच्या परळ आणि पिंपरी येथे उत्पादन सुविधा उपलब्ध असल्याने येथील उपलब्धता लक्षात घेऊन यादृष्टीने काम सुरु करण्यात यावेत. हाफकिन महामंडळाच्या पोलिओ लस उत्पादन सुविधेची असलेली वार्षिक उत्पादन क्षमतेबरोबरच कोविड लसींचा निर्मिती आणि पुरवठाही वाढविण्यात यावा. परळ येथील हाफकिन संस्थेत कालमर्यादेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी उपलब्ध असणारी जमीन, लस तयार करण्यासाठी आवश्यक असणारा खर्च, तज्ञ मनुष्यबळाची तरतूद या सगळया बाबी तपासून घ्याव्यात. हाफकिनमार्फत एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत अंदाजे १३० कोटी लस निर्माण करण्याची क्षमता आहे. सध्या भारत बायोटेकशिवाय इतर लस तयार करणाऱ्या उत्पादकांबरोबरही प्राथमिक बोलणी करण्यात यावी असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

अन्य लसींच्या उत्पादनासाठीही उपयोग

पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक यांच्याकडील लस ठोक स्वरुपात घेण्यात येणार असून ती हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत रिपॅकिंग व फिलिंग करून आवश्यकतेनुसार  उपलब्ध करुन देण्यात येईल. सध्या या लसीचे उत्पादन भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्यामार्फत संयुक्तपणे केले जाते. कोवॅक्सिन या नावाने ही लस सध्या बाजारात आणली आहे. हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनमार्फत कोविड लसीची गरज असेल तोपर्यंत हे उत्पादन सुरु ठेवण्यात येईल आणि त्यानंतर या प्लांटमधून श्वान दंशावरील लस विकसित करुन या लसीचे उत्पादन घेण्यात येईल किंवा वेळीवेळी लागणाऱ्या अन्य लसींच्या उत्पादनासाठी या प्लांटचा उपयोग करण्यात येईल. भारत बायोटेककडून ठोक स्वरुपात कोविड लस पुरविण्यासंदर्भात केंद्र शासनाला सविस्तर प्रस्ताव तातडीने पाठविण्यात येणार आहे

Web Title: Halfkin should take initiative in vaccine production chief minister uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2021 | 03:47 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.