
England gave a victorious farewell to James Anderson
Happy Retirement to James Anderson : लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लड संघाने दणदणीत विजयासह जेम्स अँडरसनला मोठ्या दिमाखात विजयी निरोप दिला. गस ऍटकिन्सन आणि जेम्स अँडरसन यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. दुसऱ्या डावात 136 धावा करीत वेस्ट इंडिजचा संघ सर्वबाद झाला. अशाप्रकारे इंग्लंडचा महान कसोटी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला शानदार निरोप मिळाला. जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज म्हणून आपली कारकीर्द संपवली.
End of an era. Thank you, Jimmy Anderson 👏#WTC25 #ENGvWI pic.twitter.com/lJ3kFSHgUX — ICC (@ICC) July 12, 2024
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरच केली होती कारकिर्दीची सुरुवात
जेम्स अँडरसनने याच मैदानावरून आपली कारकीर्द सुरू केली होती. आणि याच मैदानावर त्याला आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळायला मिळाला ही मोठी भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांने म्हटले. कसोटीमध्ये 700 विकेट्स घेऊन सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
मोठ्या दिमाखात निरोप
21 Years
188 Games
40,001 Deliveries
703 Wickets For the Final Time, Jimmy Anderson 🫡 The Greatest Ever 👏🏻 #ENGvWI #JamesAndersonpic.twitter.com/z2YH2VQuKF — Richard Kettleborough (@RichKettle07) July 12, 2024
नाणेफेक जिंकून केले होते वेस्ट इंडिजला आमंत्रित
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या डावात 121 धावा करून वेस्ट इंडिजचा संघ सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडने 371 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी मिळवली होती, मात्र, वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात केवळ 136 धावांवरच मर्यादित राहिला.
इंग्लडचा मोठा विजय
लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडने गस ऍटकिन्सच्या 7 विकेट्सच्या जोरावर वेस्ट इंडिजला केवळ 121 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात यजमान संघाने 371 धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रोली (76), ऑली पोप (57), जो रूट (68), हॅरी ब्रूक (50) आणि जेमी स्मिथ (70) यांनी अर्धशतके झळकावली. अशाप्रकारे इंग्लंडने त्यांच्या डावात 250 धावांची आघाडी घेतली होती.
इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खूपच निराशाजनक झाली. संघाने वारंवार अंतराने विकेट गमावल्या. दुसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजने ७९ धावांत ६ विकेट गमावल्या. त्यामुळेच खेळाच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने वेस्ट इंडिजचा दुसरा डाव आटोपला आणि पहिला कसोटी सामना एक डाव आणि १३६ धावांनी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. अशाप्रकारे लंच ब्रेकपूर्वीच पाहुण्या संघाने सामना जिंकला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात गस ऍटकिन्सने 5 बळी घेतले. अशाप्रकारे त्याने सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या होत्या. जेम्स अँडरसनने तीन तर कर्णधार बेन स्टोक्सने दोन बळी घेतले.