

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू जपानच्या यामा गोचीचा २-० ने पराभूत करून महिला एकेरीच्या सेमी फायनल फेरीत आपले स्थान पटकावले आहे.आता पी.व्ही सिंधूकडून सुवर्ण पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आगेकूच करत सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
तब्बल ५५ मिनिटांच्या सामन्यांत २१- १३, २२- २०अशा फरकारने सिंधूने सामना जिंकलाय. या विजयामुळे सिंधू केवळ पदकापासून एकच पाऊलं लांब आहे.सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तिने विजय मिळवला होता. तर आज सिंधूची घौडदौड सुरुच असून तिने आता थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग चौथा विजय आहे.
सिंधूने या सामन्यामध्ये आकामी यामागोची विरुद्ध खेळताना चांगली सुरवात करत स्कोअर २१-१३ असा होता. त्यानंतर यामागोचीने कमबॅक करत स्कोर १६-१५ वर आणला. मात्र सिंधूनेही मागे न हटता सेट आपल्या नावे करून घेतला. तर दुसऱ्या सेटमध्ये हाफ टाइमपर्यंत सिंधूने ११-८ फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने २२- २०च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला.