या श्रावण महिण्यात घरच्या घरी बनवा उपवासाच बटाटा शेव, खाण्यास एकदम टेस्टी!

श्रावण महिण्यात नेहमी नेहमी उपवासाला काय खायला करायचं असा प्रश्न पडतो पण आज आम्ही तुम्हाला एक क्लासी उपवासाची रेसिपी सांगणार आहोत.
potato sev
Published on: 
Updated on: 

श्रावण महिण्यात अनेकजण उपवास करतात. या काळात उपवासाला खाता येईल असे अनेक पदार्थ आहेत. यामध्ये साबुदाणा आणि बटाटा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. मात्र नेहमी साबुदाण्याची खिचडी आणि बटाट्याचा शिरा किंवा इतर कुठलाही पदार्थ खाऊन तुम्ही कंटाळले असाल तर, यावेळी तुम्ही उपवासाचा एक नवीन पदार्थ ट्राय करा,  आज आम्ही तुम्हाला उपवासाला खाता येईल अशी बटाट्याची शेव (Potao Sev) कशी बनवायची हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • बटाटे
  • हिरव्या मिरच्याची बारीक पेस्ट
  • जिरेपूड
  • राजगिऱ्याचे पीठ
  • तेल
  • खाण्याचा पिवळा रंग.

कृती :

  • बटाटे स्वच्छ धुवून घ्या.
  • या बटाट्यांना कुकरमध्ये वाफवून गार करा.
  • त्यानंतर पुरणयंत्रातून बटाटे बारीक वाटून घ्या.
  • त्यात हिरव्या मिरच्याची पेस्ट, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, आणि हलका पिवळा रंग टाका
  • त्याला एकत्र मळा आणि शेवपात्रातून शेव पाडा.
  • त्यानंतर तळा. कुरकुरीत शेव तयार होणार