सातारा : जावळी तालुक्यातील इयत्ता ९ वी च्या वर्गात शिकत असलेल्या (१४ वर्षीय) अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून तिच्याच वर्गातल्या मुलांनी वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोन अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही मुलगी गर्भवती असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गातल्या अल्पवयीन मुलांनी चाकूचा धाक दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात मेढा पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली असून, दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांना बालसुधारगृह तथा रिमांड होम सातारा येथे दाखल करण्यात आले आहे.
[read_also content=”मग कोरोना घात करणार हे नक्की : “निर्बंध शिथिल होताच गर्दी वाढू लागली आहे, काळजी घ्या”, केंद्रीय सचिवांचा राज्यांना सतर्कतेचा इशारा! https://www.navarashtra.com/latest-news/as-soon-as-the-restrictions-are-relaxed-the-crowd-starts-growing-be-careful-the-union-secretary-warns-the-states-through-writes-letter-nrvb-144368.html”]
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळी तालुक्यातील (१४ वर्षीय) एक अल्पवयीन मुलगी शेतात तिच्या कुटुंबीयांसह राहत होती. तिच्याच वर्गात शिकत असलेली दोन मुले शेतातल्या अल्पवयीन मुलीच्या घरी आले. घरात कोणी नसताना पाहून चाकूचा धाक दाखवत तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. याचे मोबाईलवर चित्रीकरणदेखील करण्यात आले. मोबाईलवर केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे व शेतातल्या घरात कोणीही नसताना याचा फायदा घेत एक महिना सातत्याने दोन्ही अल्पवयीन मुलांनी वारंवार बलात्कार केला असल्याची तक्रार देखील अल्पवयीन मुलीने आपल्या फिर्यादीत दिली आहे.
यामुळे भीतीच्या छायेखाली असल्याने तिने याबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र यानंतर तिच्या पोटात दुखू लागल्याने कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या पोटात सात महिन्याचा गर्भ असल्याची खळबळजनक माहिती समोर आली. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर फिर्यादी व कुटुंबीयांनी पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणली.
[read_also content=”रामदेव बाबांच्या ‘या’ कंपनीवर ३,३७५ कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर, बालकृष्ण आणि भाऊ जामीनदार, गुंतवणुकदारांवर काय परिणाम?; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/ruchi-soya-baba-ramdev-company-have-to-pay-bank-loan-of-3375-crore-rupees-nrvb-144356.html”]
त्यानंतर तिच्याच वर्गात शिकत असणाऱ्या दोन मुलांच्या विरोधात सर्व हाकिकत पीडितेने सांगितल्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी केली असता, संबंधित दोन अल्पवयीन मुले दोषी आढळली व त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन सातारा येथील बालसुधारात दाखल करण्यात आले. यासंदर्भात मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल माने, इमरान मेटकरी, पद्मश्री घोरपडे, रफिक शेख करत आहेत.
In Satara a minor girl was raped by the same classmates with a knife Find out what happened next