सातारा – सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या संख्येत वाढ होतोना दिसत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात आणखी १३५ कोरोनाबाधित रूग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ हजार ३३८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत एकूण ११६ जणांचा बळी गेला आहे.
काल सोमवारी सातारा जिल्ह्यात १३५ कोरोना बाधितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या दोन कोरोनाबाधित रूग्णांमध्ये कुमठे ता. कोरेगाव येथील ७६ वर्षीय पुरुष आणि लोणंद ता. खंडाळा येथील ६५ वर्षीय महिला अशा दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा पाठोपाठ खंडाळा तालुक्यातील पाडेगाव, विंग, शिरवळ अशा भागांचा समावेश आहे. तसेच खटाव तालुक्यातील बनपुरी, निगडे, चाफळ आणि वाई तालुक्यातील पसरणी, रेणावले, बोरगाव, शहाबाग, अशा आदी. गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.