भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना आजपासून (शुक्रवार) सुरु होत असून पुढील ५ दिवस भारत आणि न्यूझीलंडसह जगभरातील क्रिकेटप्रेमींना सामना पाहण्याची पर्वणी मिळणार आहे. दोन्ही संघ सध्या सामना खिशात घालून शेवट गोड करण्याच्या तयारीत असून गेल्या काही दिवसांतच दोन्ही संघांनी कसून सराव केलाय.
भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा शांत आणि संयमी कर्णधार केन विल्यमसन हे या सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. १८ ते २२ जूनदरम्यान हा सामना रंगणार असून इंग्लंडच्या साऊदेम्प्टन मैदानात तो खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपचा हा अंतिम सामना असून खराब हवामानाचं सावट या सामन्यावर आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर अधिक दबाव येणार असून त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. बँटिगमध्ये रोहित शर्मासोबत शुभमन गिलला ओपनिंगची संधी देण्यात आलीय. ऋषभ पंतदेखील सध्या फॉर्ममध्ये असून त्याच्याकडून टीम इंडियाला जोरदार कामगिरीच्या अपेक्षा आहेत. [read_also content=”दोन-चार आठवड्यात महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येणार; रुग्णसंख्या ४ लाखांपर्यंत जाणार? टास्कफोर्सचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/the-third-wave-of-corona-in-maharashtra-in-two-to-four-weeks-will-the-number-of-patients-go-up-to-4-lakhs-taskforce-warning-nrvk-143781.html”]
जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या तीन जलदगती गोलंदाजांना संघात स्थान देण्यात आलंय. तर रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन हे दोन फिरकीची मदार सांभाळणार आहेत.