शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी एक योजना जाहीर करून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला. या दिवशी पेट्रोल पंपावर प्रत्येक नागरिकाला १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल मिळेल, असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्याशिवाय भाजपचे सदस्य असल्याचं कार्ड दाखवल्यास १ लिटर पेट्रोल मोफत मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. विशेष म्हणजे ज्या पेट्रोल पंपावर हा कार्यक्रम घेण्यात आला, तो नारायण राणेंच्या माल...
पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जूनला जम्मू काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेत जम्मू काश्मीरच्या निवडणुका हाच मुख्य मुद्दा असणार असून राज्यातील लोकशाही व्यवस्था सार्वत्रिक निवडणुकीच्या मार्गाने पूर्ववत करण्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. लवकरच जम्मू काश्मीर विधानसभे...
ही तीन मुलं मुंबईतील दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होती. ४, ६ आणि १४ वर्षं वय असणाऱ्या मुलांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः मधुमेह असणाऱ्या रुग्णांना काळ्या बुरशीचा सर्वाधिक धोका असतो. मात्र तीन मुलांपैकी ४ आणि ६ वर्षाच्या मुलांना मधुमेह नव्हता, तरीही त्यांना आपले डोळे गमावावे लागले....
भारताचा आक्रमक कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा शांत आणि संयमी कर्णधार केन विल्यमसन हे या सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. १८ ते २२ जूनदरम्यान हा सामना रंगणार असून इंग्लंडच्या साऊदेम्प्टन मैदानात तो खेळवला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रंटलाईन वर्कर्ससाठीच्या क्रॅश कोर्सचं उद्घाटन करतील. त्यानंतर ते देशाला संदेशपर भाषणही करणार आहेत. देशातील २६ राज्यांमध्ये एकूण १११ प्रशिक्षण केंद्रं यासाठी उभारण्यात आलीयत. कौशल्य विकास मंत्रालयाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधानांच्या मा...
कोव्हॅक्सिनच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सध्या जागतिक आरोग्य संघटनेत सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारी EOI (Expression of interest) कोव्हॅक्सिननं दाखल केले असून जागतिक आरोग्य संघटनेनं ते स्विकारले आहेत. मान्यतेची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी काही अतिरिक्त डेटा जागतिक आरोग्य संघ...
या दोघांनी नोकरी सोडून एक स्टार्टअप सुरु करण्याचा निर्णय घेतला. शालेय मुलांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीशी जोडणारा प्रयोग त्यांनी सुरु केला. वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन त्यांना आपली संकल्पना समजावून सांगितली. गेले वर्षभर केलेले प्रयत्न आणि वेळोवेळी केलेल्या सुधारणा यांच्या जोरावर या प्रयोगाला...
बँक ऑफ अमेरिकाच्या अहवालात भारतीय आयटी क्षेत्रात लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. भारतात वाढत चाललेल्या ऑटोमेशन तंत्रज्ञानामुळे विप्रो, इन्फोसिस, कॉग्निजंट यासारख्या बड्या कंपन्यांमधील अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते, असं या अहवालात म्हणण्यात आलंय...
भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान यांचा क्वाड हा गट आहे. लसींची निर्मिती आणि उत्पादन याबाबत या चार देशांमध्ये करार होण्याची शक्यता असून त्याबाबतची बोलणी सुरु असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र खात्यानं दिलीय. २०२२ च्या अखेरपर्यंत लसींची निर्मिती १०० कोटींनी वाढवणं, हा यामागचा उद्देश असल्याचं प...
देशात गेल्या २४ तासात ६७, ५४९ नवे कोरोना रुग्ण आढळलेत, तर १३३२ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत. गेल्या २ दिवसांत हे काहीसे वाढलेले असले तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असल्याचं दिसतंय. गेल्या बुधवारी देशात आढळलेल्या नव्या कोरोना रुग्णांची संख्या होती ९० हजार. त्या तुलनेत या आठवड...
वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करता यावेत आणि काहीही करून दुसरी लस मिळावी, यासाठी अनेकांनी मोबाईल नंबर बदलून एकाच नावाची नोंदणी केल्याची बाब आता समोर येतेय. लस मिळत नसल्यामुळे अशा प्रयत्नांनी लस मिळवण्याची तयारी नागरिकांनी केल्याचं यातून दिसतंय. अशा प्रकारची रजिस्ट्रेशन्स आता काढून टाकण्याचं काम सुरू...
न्यूयॉर्कमध्ये आता सर्व प्रकारचे व्यापार सुरू होतील आणि लवकरच कोरोनापूर्व परिस्थितीत आपण जाऊ, असं क्युमो यांनी म्हटलंय. सर्व दुकानं, खेळांची मैदानं, सामाजिक कार्यक्रम, थिएटर्स, नाट्यगृहं, मॉल्स, बांधकाम व्यवसाय आणि इतर सर्व गोष्टी खुल्या करण्यासाठी परवानगी देण्यात आलीय. लवकरच जोरदार आतषबाजी करून ...
गेल्या काही आठवड्यांपासून सोमवारच्या तुलनेत मंगळवारी आकडेवारी वाढण्याचा सिलसिला दिसून येत आहे. त्यामागे काही विशिष्ट कारणं आहेत. साधारणतः दर शनिवारी आणि रविवारी देशात होणाऱ्या कोरोना टेस्टचा आकडा कमी झाल्याचं दिसतं. शनिवार आणि रविवारी नागरिक टेस्ट करण्यासाठी कमी संख्येनं बाहेर पडत असल्याचं दिसतं....