सौजन्य- x
Box office: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार कमल हसनचा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट ‘इंडियन 2’ला पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई सुरु केली, मात्र आता चित्रपटाची कमाई वाढण्याऐवजी घटू लागली आहे. ओपनिंग वीकेंडलाही ‘इंडियन 2’ फारशी कमाई करू शकला नाही. मात्र, कमल हसनच्या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनसाठी ओपनिंग विकेंड हा महत्वाचा फेक्टर असतो. त्यामुळे ‘इंडियन 2’च्या व्यवसायावर याचा थेट परिणाम होणार आहे.
कमल हसनच्या ‘इंडियन ३ दिवसात ५० कोटींचा टप्पा ओलांडला आहे, मात्र चित्रपटाची कमाई दररोज सातत्याने घटत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी 25.6 कोटींचा व्यवसाय केला. यानंतर दुसऱ्या दिवशी (शनिवारी) चित्रपटाने १८.२ कोटींची कमाई केली. त्याचवेळी, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ‘इंडियन 2’चे कलेक्शन १५.३५ कोटींवर घसरले.
तीन दिवसांत इतके कोटींची कमाई केली
वीकेंडला चित्रपटाची कमाई साधारण वाढते मात्र इंडियन २ चित्रपटाच्या बाबतीत वाढली परिस्थिती उलट आहे. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. इंडियन २ हा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झालाा आहे आणि या सर्व भाषांमध्ये मिळून ‘इंडियन 2’ ने तीन दिवसांत देशभरात ५९.१५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ‘इंडियन २’ ने तमिळ भाषेत सर्वाधिक ४१.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.हा चित्रपट तमिळ इडस्ट्रीचा तयार झाला आहे. तेलगूमध्ये, ‘इंडियन २’ ने केवळ १३.७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे आणि हिंदीमध्ये, केवळ ३.९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
१९९६ मध्ये इंडियन २०२४ मध्ये इंडियन-२
कमल हसनचा ‘इंडियन 2’ हा १९९६ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपट ‘इंडियन’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात कमल हसनची दुहेरी भूमिका होती. इंडियन २ मध्येही कमल हसन एका 75 वर्षीय कमांडरच्या भूमिकेत दिसला आहे. कमल हसन व्यतिरिक्त साऊथ स्टार सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह, एसजे सूर्या, बॉबी सिम्हा आणि गुलशन ग्रोवर यांनी या चित्रपटामध्ये काम केले आहे. कमल हसनचा ‘इंडियन’ बनवणाऱ्या शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.