Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : भारतीय हॉकीपटू ‘मेजर ध्यानचंद यांचे निधन; जाणून घ्या 03 डिसेंबरचा इतिहास

हॉकी या खेळातील जादूगार म्हणून ओळख असलेले मेजर ध्यानचंद यांनी 1989 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांना 'हॉकीचे जादूगार' म्हणून ओळखले जाते.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 03, 2025 | 10:49 AM
Indian hockey player Major Dhyan Chand death anniversary 03 December Marathi dinvishesh

Indian hockey player Major Dhyan Chand death anniversary 03 December Marathi dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय हॉकी क्षेत्रातील एक उत्तुंग खेळाडू म्हणजे मेजर ध्यानचंद. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकून दिली. त्यांच्या महान योगदानाबद्दल, त्यांचा जन्मदिवस, २९ ऑगस्ट, भारतात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी 1989 मध्ये ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचे निधन झाले.

03 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1796 : दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.
  • 1818 : इलिनॉय हे युनायटेड स्टेट्सचे 21 वे राज्य बनले.
  • 1829 : लॉर्ड विल्यम बँटिंगने सती प्रथेवर बंदी घातली.
  • 1870 : बॉम्बे म्युच्युअल लाइफ ॲश्युरन्स सोसायटी, भारतातील पहिली विमा कंपनी स्थापन झाली.
  • 1925 : आयरिश फ्री स्टेट, नॉर्दर्न आयर्लंड आणि युनायटेड किंगडम यांच्यात आयर्लंडच्या फाळणीला औपचारिकता देणारा अंतिम करार झाला.
  • 1927 : लॉरेल आणि हार्डीचा पहिला चित्रपट ‘पुटिंग पॅट ऑन द फिलिप्स’ रिलीज झाला.
  • 1965 : सोव्हिएत युनियन, लुना 8 नावाच्या लुना प्रोग्रामची स्पेस प्रोब प्रक्षेपित झाली, परंतु चंद्रावर क्रॅश झाली
  • 1967 : डॉ. क्रिस्टियान बर्नार्ड यांनी केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेत जगातील पहिले यशस्वी मानवी हृदय प्रत्यारोपण केले.
  • 1971 : पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.
  • 1973 : पायोनियर प्रोग्राम : पायोनियर 10 ने ज्युपिटरच्या पहिल्या क्लोज-अप प्रतिमा परत पाठवल्या.
  • 1979 : आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.
  • 1984 : भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे 20,000 इतकी झाली.
  • 1992 : जागतिक अपंग दिन.
  • 1994 : सोनीने जपानमध्ये पहिले प्लेस्टेशन रिलीज केले
  • 1999 : अंतराळयानाने मंगळाच्या वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी काही क्षणांपूर्वी नासाचा मार्स पोलर लँडरशी रेडिओ संपर्क तुटला.
हे देखील वाचा : 3 डिसेंबर का आहे इतका महत्त्वाचा? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे महत्त्व

03 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1776 : ‘श्रीमंत यशवंतराव होळकर’ – होळकर साम्राज्याचे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑक्टोबर 1811)
  • 1882 : ‘नंदलाल बोस’ – जगविख्यात चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 एप्रिल 1966)
  • 1884 : ‘डॉ. राजेंद्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 28 फेब्रुवारी 1963)
  • 1889 : ‘खुदिराम बोस’ – मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 1908)
  • 1892 : ‘माधव केशव काटदरे’ – कवी यांचा जन्म. (मृत्यू : 3 सप्टेंबर 1958)
  • 1894 : ‘दिवा जिवरतीनम’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1975)
  • 1899 : ‘रमादेवी चौधरी’ – भारतीय स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म.
  • 1937 : ‘विनोद बिहारी वर्मा’ – मैथिली लेखक यांचा जन्म.
  • 1947 : ‘अॅलिस श्वार्झर’ – एमा मॅगझीनच्या संस्थापीका यांचा जन्म.
  • 1950 : ‘एच. लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू’ – भारताचे ४२वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
हे देखील वाचा : आमदार धनंजय मुंडेंची होणार होती हत्या? आमदाराच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

03 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1552 : ‘सेंट फ्रान्सिस झेविअर’ – ख्रिस्ती धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1506)
  • 1888 : ‘कार्ल झैस’ – ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 11 सप्टेंबर 1816)
  • 1894 : ‘आर. एल. स्टीव्हनसन’ – इंग्लिश लेखक व कवी यांचे निधन. (जन्म : 13 नोव्हेंबर 1850)
  • 1951 : ‘बहिणाबाई चौधरी’ – कवियत्री यांचे निधन. (जन्म : 24 ऑगस्ट 1880)
  • 1956 : ‘माणिक बंदोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 19 मे 1908)
  • 1989 : ‘मेजर ध्यानचंद’ – भारतीय हॉकीपटू यांचे निधन. (जन्म : 29 ऑगस्ट 1905)
  • 2011 : ‘देव आनंद’ – हिंदी चित्रपट अभिनेते यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1923)

Web Title: Indian hockey player major dhyan chand death anniversary 03 december marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 10:49 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.