पॅरिस पॅरालिम्पिक : पॅरिस पॅरालिम्पिक भारताने दमदार कामगिरी केली आणि टोकियो पॅरालिम्पिक २०२० चा रेकॉर्ड मोडला. आता भारताने पॅरिस पॅरालिम्पिकच्या दहाव्या दिवशी आणखी मेडलची कमाई केली आहे. भारताच्या खात्यामध्ये २९ मेडल जमा झाले आहेत. भारताचा नवदीप सिंह याने F४१ या कॅटेगिरीच्या भालाफेक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्ण पदकावर नाव कोरल आहे. नवदीप सिंह याने ४७.३२ मीटरचा भालाफेकून गोल्ड मेडल नावावर केले आहे. याच स्पर्धेच्या दरम्यान नवा वाद समोर आला आहे. या स्पर्धेमध्ये नवदीपचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता परंतु त्याला स्पर्धेमधून डिसक्वालिफाय करण्यात आले आहे. त्यामुळे जो भालाफेकपटू दुसऱ्या क्रमांकावर होता त्याला पॅरालिम्पिक चॅम्पियन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
भारताच्या नवदीपनं ४७.३२ मीटर पॅरालिम्पिक रेकॉर्ड मोडला आणि चार थ्रो पर्यत तो पहिल्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याला दुसऱ्या क्रमांकावर जावे लागले कारण इराणच्या भालाफेकपटूने ४७.६४ थ्रो केला होता. परंतु स्पर्धेच्या दरम्यान इराणच्या भालाफेकपटूला पंचांकडून त्याला दोन येलो कार्ड मिळाल्यामुळे तो शेवटी अपात्र ठरला. परिणामी त्याने जे काही प्रयत्न केले होते ते शून्य ठरले. आणि भारताच्या पदकाचा रंग बदलला. नवदीपला गोल्ड मिळाले.
🚨Official.
Navdeep gets his gold medal. Iran’s protest rejected.
Head coach Sattanarayana Shimoga explains. @RohanDC98 @BoriaMajumdar pic.twitter.com/G3gIHMqhYH
— RevSportz Global (@RevSportzGlobal) September 7, 2024
भारताने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या दहाव्या दिवशी दोन मेडल मिळवले आहेत. भारताची सिमरन शर्माने फायनलच्या रेसमध्ये कांस्यपदक मिळवले. तिच्या या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये तिने मेडलवर कब्जा केला आहे. सिमरनने 24.75 सेकंड अंतरामध्ये रेस पूर्ण करून कांस्यपदक मिळवले आहे. मेडल टॅली मध्ये भारत सध्या १६ व्या क्रमांकावर आहे.
WORLD CHAMPION SIMRAN SECURES BRONZE WITH NEW PERSONAL BEST🏃♀️
Simran Sharma clocked PB time of 24.75 Sec to win🥉in finals of Women’s 200m T12
4TH TRACK MEDAL FOR 🇮🇳
Fun fact: Guide Abhay Singh is Men’s U18 NR holder in 200m & won🥉at ♂️ 200m in Asian U18 Athletics Ch’s pic.twitter.com/UDWeSObRSm
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) September 7, 2024