मधील सर्वात बेस्ट सामना उद्या, दोन्ही टीमसाठी ‘करो या मरो’, दोन दिग्गाजांमध्ये बुद्धी, कौशल्याची लढाई
उद्या दोन दिग्गजांमध्ये ‘करो या मरो’ची स्थिती, IPL 2024 मधील सर्वात बेस्ट सामना, होणार कौशल्याची लढाई
IPL 2024 मधील सर्वात महत्त्वाचा सामना उद्या 18 मे रोजी पाहायला मिळणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना या मॅचची उत्सुकता लागली आहे. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच म्हणजे जणू फायनलच असणार आहे. कारण हरणाऱ्या टीमचे आव्हान संपुष्टात येणार आहे. प्लेऑफमधील तीन टीम्स आधीच निश्चित झाल्या आहेत. प्रश्न फक्त चौथ्या टीमचा आहे.
IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये तीन टीम्स निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबाद आता फक्त चौथी टीम कुठली? त्याचा निर्णय होणे बाकी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानंतर हा निर्णय होणार आहे. शनिवारी 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. यात भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे सुपरस्टार एमएस धोनी आणि विराट कोहली आमने-सामने असणार आहेत. दोघेही मैदानावर काय कमाल दाखवतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या हे दोन्ही दिग्गज खेळाडू वेगळ्याच तयारीत आहेत.
या सामन्याती सर्वच क्रिकेटप्रेमींना उत्सुकता
बंगळुरुमध्ये होणाऱ्या या सामन्याती सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. एकाबाजूला बंगळुरु आहे. 8 पैकी 7 सामने हरल्यानंतर या टीमने उसळी घेतली. सलग 5 सामने RCB ने जिंकले. ते प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहेत. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सीजन चढ-उतारांनी भरलेला आहे. तेसुद्धा अजून शर्यतीत टिकून आहेत. एकाबाजूला विराट कोहली आहे, ज्याने त्याच्यावर उपस्थित होणारे सर्व प्रश्न, टीकेला आपल्या बॅटने उत्तर दिले आहे. दुसऱ्या बाजूला धोनी आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना खूश करतोय. धोनीचा हा शेवटचा सामना तर नाही? अशी भीती CSK चाहत्यांच्या मनात आहे.
मॅचआधीच्या फोटोमध्ये काय दिसलं?
आता प्रतीक्षा 18 मे ची आहे. हे दोन्ही दिग्गज आपल्या टीमला जिंकवून प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील. याआधी जे समोर आलेय ते फारच चांगले होते, त्यात दोघांच एकसारख रूप समोर आले आहे. मॅचच्या दोन दिवस आधी धोनी-कोहलीने बॅटिंग प्रॅक्टिस केलीच. पण, गोलंदाजीचासुद्धा सराव केला. चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात स्टार विकेटकीपर-फलंदाज धोनी आपल्या ऑफ स्पिन गोलंदाजीचा सराव दाखवताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीचा एक फोटो पोस्ट केलाय. यात तो गोलंदाजी करताना दिसतोय. या मॅचमध्ये धोनी, कोहली बॅटिंगशिवाय गोलंदाजी सुद्धा करणार का? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.