
Jagmohan dalmiya transformed cricket in India brought big money in the game
Jagmohan Dalmiya Changed History of Indian Cricket : भारताने 1983 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघांविरुद्ध विश्वचषक जिंकून क्रिकेट जगताला धक्का दिला होता. त्यावेळी जगमोहन दालमिया यांना असा विश्वास होता की, हा खेळ भारतात प्रचंड लोकप्रियता मिळवू शकतो आणि देशात एक नवीन मोहीम सुरू करू शकतो. याच कारणामुळे दालमिया यांनी 1987 च्या विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि 1987 चा विश्वचषक भारत आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आयोजित केला.
धीरूभाई अंबानी यांनीही दिला होता पाठिंबा
जगमोहन दालमिया यांच्या या प्रयत्नांना धीरूभाई अंबानी यांनी उघडपणे पाठिंबा दिला होता. अंबानी यांनीच 1987 च्या विश्वचषकाचे प्रायोजकत्व केले होते. भारतात क्रिकेटच्या माध्यमातून खूप पैसा कमावता येऊ शकतो हेही अंबानींना माहीत होते. यापूर्वी परिस्थिती अशी होती की टीम इंडियाचे सामने प्रसारित करण्यासाठी बीसीसीआय दूरदर्शनला ५ लाख रुपये देत असे.
क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यास सुरुवात
पण दालमिया यांच्या नव्या विचाराने क्रिकेटमध्ये बदल घडवून आणण्यास सुरुवात केली कारण त्यांनी टीम इंडियाच्या सामन्यांचे प्रसारण हक्क खासगी वाहिन्यांना विकण्यास सुरुवात केली. ही गोष्ट आहे 1996 च्या विश्वचषकाची जेव्हा बीसीसीआयने प्रसारण हक्क विकून 10 दशलक्ष डॉलर्स कमावले होते. भारतीय क्रिकेटमध्ये पैसा ओतण्यास सुरुवात झाली, याचे बरेचसे श्रेय जगमोहन दालमिया यांना जाते आणि भारतीय क्रिकेटपटूंनाही त्यांच्या रणनीतींचा फायदा होऊ लागला.
Jagmohan Dalmiya Transformed Cricket in India Brought Big money in The Game