Rinku Singh
Rinku Singh has Become a Millionaire : विश्वचॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाचे अनेक खेळाडूंची चांदी झालीये, असाच काहीसा अनुभव ‘रिंकू सिंह’ला आलाय. रोहितच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा संधी न मिळालेल्या खेळाडूंची निराशा झाली. राखीव खेळाडूंची आणखी निराशा झाली. तो कोअर टीममध्ये सामील होण्यापासून एक पाऊल दूर होता, परंतु, राखीव संघात एक खेळाडूदेखील होता जो निराश झाला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे नाटक करताना दिसला नाही. होय, आम्ही बोलत आहोत रिंकू सिंहबद्दल.
मी बोलल्याप्रमाणे घेऊन आलोय ट्रॉफी
गरिबीचा सामना करून IPL मध्ये आपल्या बॅटच्या बळावर टीम इंडियात एंट्री मिळवलेल्या रिंकू सिंहला टी-20 वर्ल्डकपबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, टीममध्ये असते तर बरे झाले असते, पण त्या दृष्टीने मी निराश नाही. मी खेळत नसलो तरी आमचा संघ विश्वविजेता व्हावा, असे मला वाटते. मी संघासोबत जाईन. मी माझ्यासोबत विश्वचषक ट्रॉफी घेईन. असंच काहीसं झाले. रिंकू सिंहने ट्रॉफीसोबत एक फोटो पोस्ट करीत लिहिले की, मी ट्रॉफी घेऊन येईन, असे सांगितले होते.
रिंकू सिंह अन्याय होऊनही शांत
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांची कामगिरी रिंकू सिंहच्या तुलनेत चांगली नाही अन् नव्हती, परंतु असे असूनही त्यांना प्रचंड मानधन मिळते. रिंकू सिंहला गेल्या मोसमात खेळण्यासाठी फक्त ५५ लाख रुपये मिळाले होते. यावर एकदाही प्रश्न उपस्थित करण्याचे रिंकू सिंहने कटाक्षाने टाळले. साहजिकच त्याला काही बोलायचेच नव्हते, पण छोट्या खेळाडूंसाठी करोडो रुपयांचा बळी जात असल्याचे पाहून रिंकू सिंहवर अन्याय होत असल्याचे सर्वांनाच वाटले.
कोणतीही तक्रार न करता टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत विजय साजरा
United in victory! Celebrating with Virat Kohli, Arshdeep Singh, Axar Patel, Rinku Singh, Mohammed Siraj, and Khalil Ahmed after winning the T20 World Cup 2024! 🏆🇮🇳#ChampionSquad #T20WorldCup2024 #TeamIndia #T20WorldCupFinal #ICCT20WorldCup #VmenContent pic.twitter.com/KHrcPVlYns
— VMEN-Viral Videos, Memes, Edits & News (@vmencontent) June 30, 2024
रिंकू सिंहसोबत या खेळाडूंना मिळणार 1 कोटी
त्या क्रिकेट चाहत्यांच्या मनाला आता गारवा वाटत असावा. खरं तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या संघ, प्रशिक्षक कर्मचारी, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांसाठी 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली. अहवालांवर विश्वास ठेवला तर राखीव खेळाडूंना प्रत्येकी १ कोटी रुपये मिळतील. म्हणजेच शुभमन गिल, खलील अहमद आणि आवेश खान यांच्यासोबत रिंकू सिंहलाही एक कोटी मिळणार आहेत. ही रक्कम केकेआरकडून मिळालेल्या पैशांपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, रिंकू सिंह झिम्बाब्वे दौऱ्यावर टीम इंडियासोबत आहे. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टॉप ऑर्डरमध्ये खेळताना त्याने 22 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 48 धावांची नाबाद खेळी खेळली. दोन्ही संघांमधील तिसरा सामना 10 जुलै रोजी होणार आहे.