बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांनी शर्टलेट फोटोशूट केले आहेत अगदी शाहरुख खान, सलमान खान आमीर खान पासून अभिषेक बच्चन पर्यंत मात्र मराठी सिनेसृष्टीमध्ये शर्टलेस फोटोशूट तसं कमीच पाहिलं जातं मात्र उन्हाळा सुरु होताच असे वेगवेगळ्या मूड्सचे फोटोशूट आता मराठी सिनेसृष्टीमध्ये व्हायला लागले आहेत. अलिकडेच ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ललित हा पाठमोरा उभा आहे. त्यासोबत तो शर्टलेस होऊन शॉवर घेत असल्याचेही दिसून येत आहे. ललितने स्वत:चा शर्टलेस फोटो शेअर त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तो म्हणाला, ‘प्रश्न पोटा पाण्याचा असला तरी पाठा पाण्याला विसरून चालणार नाही’.
त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर अनेक मराठी कलाकाराही त्याच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहे. मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, निपुण धर्माधिकारी अशा अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.