कोलकाता : राजकारणात कोणी कोणाचा फार काळ जसा मित्र नसतो, तसाच तो फार काळ शत्रूही राहत नाही, असे म्हटले जाते. राजकारणात काहीही अशक्य नसते, हे आजपर्यंत राज्यासह देशात घडलेल्या राजकीय घडामोडींवरून अनेकदा स्पष्ट झाले आहे. याचाच प्रत्यय आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संबंधांबाबत येऊ लागला आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं आता काहीशा नरमल्याचे दिसत आहे. ममतांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमधील सर्वाधिक गोड असलेले आंबे पाठविले आहेत. राजकारणातील कटूता दूर करण्यासाठी नेत्यांकडून अशा प्रकारे आंबे पाठविण्याची परंपरा आहे. यामुळे, मोदींसोबतचे ताणले गेलेले संबंध पुन्हा मधूर करण्यासाठी ममतांनी ‘मँगो डिप्लोमसी’चा योग्य वापर केल्याचे यावरून दिसून येत आहे.
बंगालमधील निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ममतांमध्ये जोरदार शाब्दिक फैरी झडल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला होता. निवडणुकीनंतर बंगालचे मुख्य सचिव अलपन बंदोपाध्याय यांच्या मुद्यावरूनही केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले होते. पंतप्रधान मोदींना आंबे पाठवून ममतांनी राजकीय कटूता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
ममतांनी पंतप्रधान मोदींना हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग हे आंबे पाठविले आहेत. पंतप्रधान मोदींशिवाय ममतांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंबे पाठविले आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय हिंसाचार उफाळून आला होता. यात अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. यावरून भाजपा अजूनही आक्रमक आहे तर कोलकाता हायकोर्टाच्या आदेशावरून निवडणुकीनतंरच्या हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून चौकशी सुरू आहे. आयोगाने आपला अहवाल सोपवला आहे. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनताही बंगालमधील हिंसाचारावर तृणमूल काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना आंबे पाठविल्याने भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील कटूता किती कमी होईल, हे पुढील काळात दिसेलच.
[read_also content=”जन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि… https://www.navarashtra.com/latest-news/gave-birth-to-an-upturned-girl-the-parents-were-terrified-when-they-saw-the-baby-and-nrvk-146438.html”]
[read_also content=”जीवघेण्या व्हायरसने झोप उडवली https://www.navarashtra.com/latest-news/panic-of-corona-virus-delta-spread-rapidly-in-8-states-including-maharashtra-nrvk-146421.html”]
[read_also content=”प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम https://www.navarashtra.com/latest-news/vanilla-ice-cream-will-be-made-from-plastic-waste-nrvk-146253.html”]
[read_also content=”तब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप https://www.navarashtra.com/latest-news/the-couple-had-been-tying-each-others-hands-for-123-days-now-they-had-a-breakup-nrvk-145996.html”]
[read_also content=”नाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका https://www.navarashtra.com/latest-news/night-shifts-can-be-dangerous-risk-of-diseases-such-as-heart-disease-brain-disease-and-cancer-nrvk-145999.html”]
[read_also content=”एकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या https://www.navarashtra.com/latest-news/mansukh-hiren-murder-case-sunil-mane-remanded-in-nia-custody-till-june-25-pradeep-sharma-is-allowed-to-meet-lawyers-every-day-nrvk-145535.html”]
[read_also content=”‘माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट’; एनआयएसमोर महिला हजर https://www.navarashtra.com/latest-news/my-husband-pradip-sharmas-collection-agent-women-present-before-nis-nrvk-145557.html”]
[read_also content=”सकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे? तुमचा दिवस शुभ जाईल https://www.navarashtra.com/latest-news/what-to-see-when-you-wake-up-in-the-morning-have-a-good-day-nrvk-145114.html”]