Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कंपनीची स्कूटर ठरली भारतीयांची पहिली पसंती! कंपनीने नोंदवली तब्बल 114 टक्कांची रेकॉर्डब्रेक विक्री वाढ

भारतामध्ये  अनेक कंपन्या आपल्या स्कूटरची बाजारात विक्री करत आहेत. मात्र एक वाहन निर्मिती करणारी अशी कंपनी आहे जिने विक्रीच्या बाबतीत सर्व कंपन्यांना मागे टाकत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे ही कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींची निर्मिती करते.

  • By नारायण परब
Updated On: Aug 27, 2024 | 09:25 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतीय ग्राहकांकडून वाढू लागली आहे. त्यातल्या त्यात बाईक आणि स्कूटरची मागणी ही जास्त आहे.  दर महिन्याला बाजारपेठेमध्ये नवनवीन  टू-व्हीलर लॉंच केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वेगवेगळे पर्यायही उपलब्ध होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणेज या बाईक अथवा स्कूटर इंधन खर्चात प्रचंड कपात करतात आणि पर्यावरणपूरक असल्याने सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे. फक्त इलेक्ट्रीक वाहननिर्मिती कंपन्या या दुचाक्यांच उत्पादन करतातच मात्र प्रस्थापित कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक टू व्हीलर तयार करण्याकडे जास्त लक्ष दिले आहे.

या कंपनीचे वर्चस्व

भारतामध्ये  TVS, Hero, Ather यासह अनेक कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारात विक्री करत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणारी अशी  एक कंपनी अशी आहे जिने विक्रीच्या बाबतीत या मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. ती कंपनी आहे, ओला इलेक्ट्रिकद्वारे  जुलै 2024 मध्ये 114.49 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 41,624 इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री करण्यात आली आहे. कंपनीची जुलै २०२३ मध्ये एकूण विक्री फक्त १९,४०६ युनिट्स होती. विक्रीतील या वाढीमुळे, ओला इलेक्ट्रिकचे टू व्हीलर प्रकारामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले असून  या विभागातील बाजारातील हिस्सा 38.64 टक्के झाला आहे.

सध्या ओला इलेक्ट्रिकचे तीन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये S1 Pro, S1 Air आणि S1 यांचा समावेश आहे Ola S1 pro ही कंपनीची सर्वात प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर आहे ज्याची किंमत 1.34 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर Ola S1 Air ची किंमत 1,06,499 रुपये (एक्स-शोरूम) आणि Ola S1 ची किंमत आहे . ओलाकडून ola Roadster या  इ बाईकचेही 15 ऑगस्टला लॉंचिग केले गेले आहे. या बाईकची एक्स-शोरूम किमंत  74999 रुपयांपासून सुरु होते.

हे देखील वाचा-नितिन गडकरी यांनी आणलेल्या ‘या’ योजनेमुळे, कार खरेदीवर मिळणार 25 हजार रुपयांची सवलत

पहिल्या पाच कंपनी भारतीय 

विक्रीच्या या यादीत भारतीय कंपन्यांनीच पहिल्या पाच क्रमवारीमध्ये स्थान मिळविले आहे. ओलानंतर  टीव्हीएस दुसऱ्या स्थानावर असून या कालावधीत, कंपनी ने 87.40 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 19,486 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. TVS आपल्या iQube इलेक्ट्रिक स्कूटरचे तीन मॉडेल बाजारात विकत आहे. बजाजने या यादीत तिसरे स्थान पटकावले आणि एकूण 17,657 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री 327.43 टक्के वार्षिक वाढीसह नोंदवली.

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीच्या या यादीत एथर एनर्जी चौथ्या क्रमांकावर आहे. या कालावधीत, एथरने 50.89 टक्के वार्षिक वाढीसह एकूण 10,087 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री केली. तर Hero MotoCorp ने 409.60 टक्के वार्षिक वाढीसह Vida इलेक्ट्रिक स्कूटरच्या एकूण 5,045 युनिट्सची विक्री करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

 

Web Title: Ola company scooter has become the first choice of indians the company registered a record breaking sale growth of 114 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 09:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.