काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्यानंतर सगळ्यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात धाव घेतली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांचा समावेश आहे. धनंजय मुंडेंना हृदयविकाराचा झटका आला नसून सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपल्याची माहितीही अजित पवारांनी दिली. आता नुकतीचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. यावेळी प्रितम मुंडे, यशश्री मुंडे आणि पंकजांच्या आई देखील उपस्थित होत्या.
धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा झटका आता हे वृत्त चुकीचे आहे, डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या सांगितल्या असून, मुंडे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर धनंजय मुंडेंच्या बाबत कळताच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. काळजी घे, दगदग करू नकोस, मी सोबत आहे, बहीण पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना सल्ला दिला.
[read_also content=”उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची केली चौकशी, मुडेंना हृदयविकाराचा झटका आला नाही – अजित पवार https://www.navarashtra.com/maharashtra/deputy-chief-minister-ajit-pawar-inquired-about-dhananjay-munde-condition-in-hospital-this-morning-mude-did-not-have-a-heart-attack-ajit-pawar-268276.html”]
[read_also content=”हल्लेखोर त्यांची ओळख लपवण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून आले होते, न्यूयॉर्क हल्ल्यात आतापर्यंत १६ जण जखमी https://www.navarashtra.com/world/see-the-full-story-of-the-new-york-attack-in-the-photos-the-attackers-were-dressed-as-construction-workers-16-injured-in-the-attack-268302.html”]