‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील मायरा ही सगळ्यांच्या घराघरात पोहचली आहे. मायरा सतत आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते आणि नुकतच तिने आपल्या नव्या को-या आलिशान गाडीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तिचा हा फोटो पाहून सगळ्यांना आनंद आणि अभिमान वाटत आहे. वय वर्षे अवघ 4 आणि या बालवयातच तिची ही भरारी पाहून सगळ्यांना तिचं कौतुक वाटत आहे.
मायराचे आई – वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी नुकतीच एक इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केलीय. हे फोटो शेअर करत मायराच्या आईने ‘१ जून १९६० हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल. मिस यु पापा’, असे कॅप्शन दिले आहे. मायराने या गाडीसोबत छान पोज देत फोटो काढले आहेत. या गाडीची किंमत १७ लाख रुपयांच्या जवळपास आहे.