PUBG Mobileचे भारतीय रुप म्हणजेच Battlegrounds Mobile India साठी आता Google Play वर पूर्वनोंदणीही करू शकता. या अर्थ असा नाही की, iOS युझर्स हा गेम खेळू शकणार नाहीत. यावेळी पबजी मोबाइलचे हे भारतीय व्हर्जन दक्षिण कोरिया व्हिडिओ गेम कंपनी KRAFTON तयार केला असून बाजारातही आणला आहे. जे याच गेमचे PC व्हर्जन PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG)चेही डेव्हलपर आहेत. पबजी मोबाइल बाबत भारत सरकार आणि आई-वडिलांच्या चिंता लक्षात घेऊनच नवीन गेम मध्ये नवी प्रायव्हसी पॉलिसी आणि काही नवीन गेम प्ले नियमही लागू करण्यात आले आहेत. Battlegrounds Mobile Indiaसाठी पूर्वनोंदणी कुठे करायची आणि त्यासाठी ही नोंदणी कशी करायची, ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती सविस्तर वाचा.
आज म्हणजेच १८ मे पासून भारतात Android युजर्स Battlegrounds Mobile India (PUBG Mobile India) साठी पूर्वनोंदणी करू शकता. पूर्वनोंदणी करणाऱ्या प्लेयर्सना काही खास एक्सक्लुसिव्ह रिवॉर्डही मिळणार आहेत. तथापि, क्राफ्टॉनने गेमच्या लाँचिंगची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.
जसं की आम्ही सांगितल्याप्रमाणे आजच्या घडीला पूर्वनोंदणी Android युझर्ससाठी Google Play वर करण्याची सोय उपलब्ध आहे. पूर्वनोंदणी करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोर अॅप सुरु केल्यानंतर त्यात “Battlegrounds Mobile India” गेम सर्च करावा लागेल. येथे आपल्याला KRAFTON, Inc. डेव्हलपर अॅप ओपन करायचं आहे आणि तेथे हिरव्या रंगाच्या Pre-Register बटणावर टॅप करायचे आहे. जर आपले डिव्हाईस ऑटो-इंस्टॉलेशन सपोर्ट करत असेल, तर गेम आपल्या डिव्हाईससाठी उपलब्ध होताच इंस्टॉल होईल, नाहीतर तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर याला मॅन्युअली डाऊनलोड आणि इंस्टॉल करावे लागेल.
जसं आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे याच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. पूर्वनोंदणी करणाऱ्या प्लेयर्सला एक्सक्लुसिव्ह रिवॉर्ड्ही मिळणार आहेत. यात Recon Mask, Recon Outfit, Celebration Expert Title आणि 300 AG यांचा समावेश आहे. AG गेमची नवीन करन्सी असल्याचे दिसते.
गुगल प्ले स्टोरच्या लिस्टिंगमध्ये समावेश केलेल्या माहितीनुसार गेममध्ये स्कॉडसोबतच वन-ऑन-वन गेमप्लेचा पर्यायही असणार आहे. गेम Unreal Engine 4 तयार झाला असून तो 3D साऊंडलाही सपोर्ट करतो. लाँचच्या पहिल्याच आठवड्यात लाँच वीक इव्हेंट आयोजित करण्यात येणार आहेत आणि प्लेयर्सजवळ एक्सक्लुसिव्ह आऊटफिट्य जिंकण्याच्या संधी मिळतील.
Google Play लिस्टिंगमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा गेम खेळण्यासाठी फोनमध्ये कमीत कमी Android 5.1.1 व्हर्जन असायला हवे किंवा याहून अपडेटेड व्हर्जन असणे गरजेचे आहे. याशिवाय प्लेयरच्या फोनमध्ये कमीत कमी 2GB असायलाच हवी.
बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडियाचे गेमप्ले किंवा फिचर्सची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, पण हे निश्चित आहे की, नवीन गेमचा गेमप्ले PUBG Mobile सारखाच असणार आहे. हा मोबाइल बॅटल रोयाल गेम अनेक मोड्स आणि गेमप्लेसोबत येईल. अलीकडेच डेव्हलपरने एक मॅपचा टीझर केला होता, जो PUBG Mobile चा लोकप्रिय 4×4 मॅप Sanhok असल्यासारखाच आहे. तथापि, असंही होऊ शकतं की, याचं नाव Sanhok ऐवजी काहीतरी वेगळं असावं. गुगल प्ले स्टोर लिस्टिंगमध्ये समावेश असलेल्या पोस्टरच्या उपलब्ध माहितीनुसार गेममध्ये Erangle (नाव निश्चित नाही)मॅपही असेल. लिस्टिंग स्क्रिनशॉटमध्ये एक नवीन मॅपही दिसत आहे, ज्यात अनेक मोठ्या इमारती आणि पाण्याच्या महाकाय टाक्या दिसत आहेत. याशिवाय गाड्यांमध्ये ग्लाइडर(Glider)चाही समावेश असेल. व्यक्तीरेखांमध्ये नवीन चेहरेही दिसत आहेत, जे गेममध्ये डिफॉल्ट स्वरुपात समाविष्ट असण्याची शक्यता आहे.
क्राफ्टॉनद्वारे गेमची प्रायव्हसी पॉलिसीही अपडेट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन नीतिनुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या प्लेयर्सला गेम खेळण्याची पात्रता मिळविण्यासाठी आपल्या आई-बाबांची किंवा पालकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. आई-बाबा किंवा पालक, ज्यांना असं वाटतं की, त्यांच्या परवानगीशिवाय वैयक्तिक गोष्टी प्रदान करण्यात आल्या आहेत. ते डेव्हलपर्सशी संपर्कही साधू शकतील आणि सिस्टिमधून माहिती घेण्याची विनंतीही करू शकतात.
याखेरीज हिंसाचारासंबंधित खेळातही काही बदल करता येतील अशा बातम्या आहेत. चीनमध्ये Game for Peace व्हर्जनप्रमाणेच या व्हर्जनमध्येही रक्ताच्या लाल इफेक्टला हिरव्या रंगात बदलण्यात येण्याची सोय असणार आहे. गेम खेळण्यासाठी वेळेची मर्यादाही निश्चित केली जाऊ शकते.
PUBG battlegrounds mobile india pre registrations goes live on google play store how to register new features minimum ram processor system requirements know the full story