मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती- महाविकास आघाडी सह इतर अनेक पक्षांनीही आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. आघाडी आणि युतीसाठी ही निव़डणूक प्रतिष्ठेची असली तरीही इतर पक्षही या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे ही ही निवडणूक रंजक होणार आहे.
मनसेनेही आपापले उमेदवार जाहीर केले आहे, अशातच राज ठाकरे यांनी आपली पहिली राजकीय खेळी करण्यासाठी नवा डाव टाकला आहे. राज ठाकरेंनी थेट मातोश्रीच्या अंगणातच हा डाव टाकण्याची तयारी केली आहे. भाजप नेत्या तृप्ती सावंत आज मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या आहेत.
मनसेकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच मतदारसंघात असल्यामुळे शिवसेनेसाठी हा मतदारसंघ कायम प्रतिष्ठेचा राहिला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे शिवसेनेचे वांद्रे पूर्वचे उमेदवार दिवंगत विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आणि काँग्रेसचे झिशान सिद्धिकी आमदार झाले होते. पण महाडेश्वर शिवसेनेला महाडेश्वरांचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यानंतर तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या मतदारसंघात मध्यमवर्गीय मतदारांची संख्या सर्वाधित आहे. मराठी मध्यमवर्गीय, हिंदी भाषिक आणि मुस्लीम समाजाचेही याठिकाणी लक्षणीय मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, या मतदारसंघात एकूण 254 मतदान केंद्र आहेत. अशातच तृप्ती सावंत या आता मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर त्यांना मनसेकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिकीटही मिळणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. झीशान सिद्दिकी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे (UBT) उमेदवार वरुण सरदेसाई यांच्यात लढत होणार आहे. पण तृप्ती सावंत यांना मनसेने य़ाठिकाणी उमेदवारी दिल्यास याचा फटका वरूण सरदेसाई यांना बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: ठाकरेंची मशाल गद्दारांना गाडणार का? कुर्ला विधानसभेतून प्रविणा मोराजकर विरुद्ध मंगेश