raveena tandon
गेल्या काही दिवसांपासून ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या मराठी चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser Of Sarsenapati Hambirrao) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यावर बाहुबली फेम प्रभासने हे ट्विट केले होते. तर आता बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) ‘सरसेनापती हंबीरराव’ विषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. यात सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे रवीनाने ही पोस्ट मराठीत केल्यामुळे त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
रवीनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. रवीनाने सरसेनापती हंबीररावचा टीझर ट्विट करत शेअर केला. हा टीझर शेअर करत “प्रवीण तरडे आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा”, असे कॅप्शन रवीनाने दिले आहे. रवीनाने मराठीत ट्विट करत मराठी चित्रपटसृष्टीला दिलेला पाठिंबा पाहत नेटकऱ्यांनी तिची स्तुती केली आहे.
Pravin Tarde आणि टीम सरसेनापती हंबीरराव या मराठीतील भव्य चित्रपटाला शुभेच्छा? Best wishes @WriterPravin and team .. looking forward ??? pic.twitter.com/sPhpFiXxff
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 22, 2021
प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असा चारही जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ‘मराठीत कधी दिसलं नाही असं काहीतरी, व्हीएफएक्स, भव्यदिव्य सेटने परिपूर्ण असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार’, असं तरडे या चित्रपटाविषयी म्हणाले होते. या चित्रपटाच्या भव्यतेची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते.
[read_also content=”लोकप्रतिनिधीच मास्क लावत नसतील तर कसं होणार ? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्क न लावणाऱ्या आमदारांचा घेतला समाचार https://www.navarashtra.com/maharashtra/deputy-chief-minister-concerned-about-mlas-not-wearing-mask-in-assembly-session-nrsr-214459/”]
हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सेनापती होते. आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.