भारतीय खेळाडूंचे पॅरिस ऑलिम्पिकचे वेळापत्रक : २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला (Paris Olyampic 2024) सुरुवात होणार आहे. ऑलिम्पिकचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा २६ जुलै रोजी दुपारी १२.३० ते १ दरम्यान उद्घाटन सोहळा रंगणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेसाठी जगभरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी ११७ खेळाडूंना यंदा पाठवले आहे. तर भारताच्या संघाने सर्वाधिक सात पदके टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत. आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेल्या कामगिरीनंतर आता भारताच्या खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. त्याचबरोबर आशिया स्पर्धांमध्ये सुद्धा भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. आशिया खेळांमध्ये भारताच्या पदकांची संख्या दुपट्ट होती.
भारताचे एकूण ११७ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यामध्ये ७० पुरुषांचा समावेश आहे तर ४७ महिलांचा समावेश आहे. त्याचबरोबर १४० सपोर्ट स्टाफची तुकडी भारताच्या सरकारने खेळाडूंसोबत पाठवली आहे. वैयक्तिक तिरंदाजी स्पर्धा २५ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे त्यामुळे तिरंदाजीची अंतिम फेरी २७ जुलै रोजी असणार आहे. त्यानंतर रायफल शूटिंगची पहिली फेरी २७ जुलै रोजी होणार आहे. भारताचे स्टार खेळाडू कोणत्या तारखेला खेळणार आहेत यासंदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
भारतीयांना यंदा १० हुन अधिक पदकांची अपेक्षा आहे. भारताचा टोकियोमध्ये सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्रा कडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचबरोबर भारताचा स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू कडून सुद्धा पदकाची अपेक्षा आहे.
तारीख |
इव्हेंट्स |
वेळ |
25 जुलै | तिरंदाजी | 13.00 पासून सुरु |
27 जुलै | बॅडमिंटन | 12.50 पासून सुरु |
रोइंग | 12.50 पासून सुरु | |
शूटिंग | 12.50 पासून सुरु | |
बॉक्सिंग | 19.00 पासून सुरु | |
हॉकी (भारत विरुद्ध न्यूझीलंड) | 21.00 पासून सुरु | |
टेबल टेनिस | 18.30 पासून सुरु | |
टेनिस | 15.30 पासून सुरु | |
28 जुलै | तिरंदाजी | 13.00 पासून सुरु |
बॅडमिंटन | 12.00 पासून सुरु | |
रोइंग | 13.06 पासून सुरु | |
शूटिंग | 13.06 पासून सुरु | |
बॉक्सिंग | 14.46 पासून सुरु | |
स्विमिंग | 14.30 पासून सुरु | |
टेबल टेनिस | 13.30 पासून सुरु | |
टेनिस | 15.30 पासून सुरु | |
29 जुलै | तिरंदाजी | 13.00 पासून सुरु |
बॅडमिंटन | 13.40 पासून सुरु | |
हॉकी | 16.15 पासून सुरु | |
रोइंग | 13.00 पासून सुरु | |
शूटिंग | 12.45 पासून सुरु | |
टेबल टेनिस | 13.30 पासून सुरु | |
टेनिस | ||
30 जुलै | स्विमिंग | 00.52 पासून सुरु |
तिरंदाजी | 15.30 पासून सुरु | |
बॅडमिंटन | 12.00 पासून सुरु | |
बॉक्सिंग | 14.30 पासून सुरु | |
घोडेस्वारी | 14.30 पासून सुरु | |
हॉकी | 16.45 पासून सुरु | |
रोइंग | 13.40 पासून सुरु | |
शूटिंग | 13.00 पासून सुरु | |
टेबल टेनिस | 13.00 पासून सुरु | |
टेनिस | 15.30 पासून सुरु | |
३१ जुलै | तिरंदाजी | 15.30 पासून सुरु |
बॅडमिंटन | 12.50 पासून सुरु | |
बॉक्सिंग | 15.00 पासून सुरु | |
घोडेस्वारी | 13.30 पासून सुरु | |
रोइंग | 13.24 पासून सुरु | |
शूटिंग | 13.24 पासून सुरु | |
टेबल टेनिस | 13.30 पासून सुरु | |
टेनिस | 15.30 पासून सुरु |
अपडेट सुरु आहे…