मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा रेल्वे स्टेशन, दादर रेल्वे स्टेशन आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा बंगला अशा चार ठिकाणी बॉम्ब प्लँट करण्यात आले आहेत, असा कॉल करून शुक्रवारी मुंबई पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या दोन तरुणांच्या शिळफाटा येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत़ डोंबिवलीत राहणाऱ्या राजू अंगारे आणि रमेश शिरसाट या दोघा आरोपींनी ‘गटारी’ पार्टीच्या धुंदीत शहरात बॉम्बची अफवा पसरवणारा कॉल केल्याचे उघड झाले आहे़ मात्र त्या दोघांनी मुंबई पोलीस किती सतर्क आहेत हे पाहण्यासाठी आम्ही हा कॉल केला होता, असा दावा केल्याने पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली आहे़
मुंबईत चार ठिकाणी बाॅम्ब पेरण्यात आल्याची अफवा शुक्रवारी पसरली होती़ मार्च १९९३च्या १२ बॉॅम्बस्फोटांच्या मालिकेची आठवण जागवून मुंबई पोलिसांची झोप उडाली होती़ १०० नंबरवर शुक्रवारी रात्री ८ वाजून ५३ मिनिटांनी एक फोन आला होता़ मुंबईत चार ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचे फोन करणाऱ्या इसमाने पोलिसांना सांगितले होते़ त्यानंतर पोलिसंची एकच धावपळ उडाली होती.
फोनवरून सांगण्यात आलेल्या चारही ठिकाणी सर्च ऑपरेशन तातडीने सुरू करण्यात आले. रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल तसेच बाँब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक यासह शोध घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, वाहनतळ, सर्व फलाट आणि आजूबाजूचा परिसरही तपासण्यात आला. या सर्च ऑपरेशनमध्ये एटीएस टीम, शीघ्र कृती दल तसेच स्थानिक पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. मात्र संशयास्पद अशी कोणतीही वस्तू चारही ठिकाणी आढळून आली नाही. त्यानंतर हा अफवा आणि दहशत पसरवणारा कॉल होता, या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहचले. मग पोलिसांनी कॉलरचा शोध सुरू केला.
बॉम्ब प्लांट केल्याचा निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्या क्रमांकावर संपर्क साधला होता. तेव्हा माझ्याकडे होती ती माहिती मी तुम्हाला दिली. आता मला डिस्टर्ब करू नका, असे सांगून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला होता. त्यानंतर हा फोन स्विच ऑफ लागत होता. दरम्यान, मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संबंधिताला हुडकण्यात यश मिळवले. ठाण्यातील शिळफाटा येथून राजू अंगारे आणि रमेश शिरसाट या दोघांना पोलिसांनी अटक केली. यातील एकजण ट्रक ड्रायव्हर आहे. शिळफाटा येथे हे दोघेही गटारी पार्टी साजरी करत होते. तिथूनच त्यांनी दारूच्या नशेत मुंबई पोलिसांना फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
[read_also content=”आत्महत्येपूर्वी पूजा मद्यधुंद होती! व्हिसेरा अहवालात मोठा खुलासा; राठोड यांच्या अडचणी कायम https://www.navarashtra.com/latest-news/pooja-was-drunk-before-committing-suicide-big-revelation-in-the-viscera-report-rathores-problems-persist-nrvk-165091.html”]
[read_also content=”‘या’ मंदिरात गेल्यावर होतो मृत्यू; संशोधक व वैज्ञानिक मृत्युच्या भितीने इथे जात नाही https://www.navarashtra.com/latest-news/pluto-is-the-ancient-temple-of-god-in-turkey-if-anyone-enters-this-temple-he-is-killed-nrvk-164606.html”]
[read_also content=”सायन्स फॅक्ट; कच्चे सॅलड खाल्ल्याने अनेक आजारांना निमंत्रण https://www.navarashtra.com/latest-news/science-fact-eating-raw-salads-invites-many-ailments-nrvk-164609.html”]
[read_also content=”19 वर्षीची पोरगी ६७ वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत पळून गेली आणि… https://www.navarashtra.com/latest-news/19-year-old-girl-married-to-old-man-sit-will-investigate-nrvk-164601.html”]
[read_also content=”किराणा दुकानातही मिळणार वाईन; पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण https://www.navarashtra.com/latest-news/wine-will-also-be-available-at-grocery-stores-uddhav-thackeray-will-fulfill-pawars-wish-nrvk-164211.html”]
[read_also content=”विकृताने अचानक अनोखळी महिलेला घट्ट मिठी मारली अन्… गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार https://www.navarashtra.com/latest-news/the-pervert-suddenly-hugged-a-strange-woman-and-shocking-type-at-the-crowded-dadar-railway-station-nrvk-163725.html”]